फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, घराला उंबरा म्हणजेच उंबरठा असणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तो केवळ दरवाज्याचा भाग नसून घराचे रक्षण करणारी लक्ष्मण रेखा मानली जाते. उंबऱ्याला धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि व्यावहारिक असे तिन्ही प्रकारचे महत्त्व आहे. उंबरा नकारात्मक ऊर्जा रोखतो, सकारात्मकता वाढवतो, घराची लक्ष्मी स्थिर ठेवतो आणि मुख्य दरवाजाची चौकट पूर्ण करतो. आज अनेक आधुनिक घरांमध्ये उंबरठा ठेवण्याची परंपरा कमी होताना दिसते, मात्र धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीने उंबरठ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घराला उंबराठा असण्यामागील काय आहेत कारणे जाणून घ्या
काही वास्तु मान्यतांनुसार मुख्य दरवाजाला उंबरठा नसल्यास घरातील धन टिकत नाही किंवा आर्थिक अडचणी वाढू शकतात. उंबरठा हा घरातील समृद्धीचे संरक्षण करणारा मानला जातो.
पूर्वीच्या काळात उंबरठा हा केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. उंबरठ्यामुळे धूळ, पाणी आणि कीटक घरात येण्याचे प्रमाण कमी होत असे.
उंबरा बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तीला घरात प्रवेश करण्यापासून रोखते. मुख्य प्रवेशद्वारातील वास्तूदोष कमी करण्यासाठी उंबरा महत्त्वाची भूमिका बजावतो. उंबरा हा पूजनीय आहे यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि पैसा टिकतो. उंबरठ्यावरती रांगोळी काढली जाते, हळद कुंकू लावले जाते. लक्ष्मीचे स्वागत करण्याचं ते प्रतीक मानलं जातं. उंबरठ्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्याची चौकट पूर्ण होते. ज्यामुळे घरातील ऊर्जा समतोल राहते. नववधुचे पाऊल पडताच उंबरठ्याचे पूजन केले जाते ते शुभ मानलं जातं.
उंबरठा हा नेहमी लाकडाचा असावा. कारण लाकडात नैसर्गिक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे. फ्लॅट संस्कृतीत सुद्धा मुख्य दरवाज्याला लहान का होईना पण लाकडी उंबरठा बसवणं शुभ मानलं जातं. उंबरठ्यावर पाऊल न टाकता तो ओलांडूनच प्रवेश करावा अशी प्रथा आहे. आता एकूणच उंबरा किंवा उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक उर्जेचे संरक्षण आहे म्हणूनच जर तुमच्या घराला उंबरा नसेल आणि तुम्ही जर वास्तुशास्त्र मानत असाल तर उंबराठा करून घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार उंबरठा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
Ans: उंबरठा हा घराच्या पवित्रतेचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. अनेक ठिकाणी त्यावर हळद-कुंकू लावण्याची परंपरा आहे.
Ans: लाकूड, दगड किंवा संगमरवरी उंबरठा शुभ मानला जातो.






