Maharashtra Breaking News Updates Today
Maharashtra to National And International Breaking News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर निशाणा साधला आहे. देशात महागाई आणि आर्थिक समस्या वाढत असताना पंतप्रधान परदेशात भेटवस्तू देण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
RCC Nanded: आरसीसी प्रमुख शिवराज मोटेगावकर यास अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी नांदेड शहरातील अनेक नांमांकित कोचिंग क्लासेस पूर्वसूचना न देता बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण होत आहे.
नांदेड जिल्हा हा अलीकडच्या काळात शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जात आहे. या शहरात वेगवेगळे प्रसिद्ध खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. येथे अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश नाममात्र असून खाजगी कोचिंग क्लासेसला त्यांची हजेरी असते. तसेच येथे अनेक कोचिंग क्लासेस चालक पालकांना चांगल्या मार्क्सचे अमिष दाखवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा उगळतात.
20 May 2026 05:50 PM (IST)
Bandra Gareeb Nagar News Marathi : पश्चिम रेल्वेने 19 मे 2026 रोजी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत, वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील ५०० बेकायदेशीर झोपड्यांपैकी सुमारे १८ टक्के झोपड्या हटवण्यात आल्या. ही मोहीम आज 20 मे 2026 देखील सुरू आहे.
20 May 2026 05:30 PM (IST)
जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या आगामी हॉरर चित्रपट ‘खेती’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाने लगेचच लक्ष वेधून घेतले आहे. ग्रामीण भागाची झलक, भीतीदायक वातावरण आणि रहस्यमय कथानक चाहत्यांना खूप आवडत आहे. जॅकी श्रॉफ, शरद केळकर आणि नेहा सरगम यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हॅरिस इम्तियाज खान यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून, ब्लॅककॅनव्हास स्टुडिओच्या बॅनरखाली सना खान यांनी याची निर्मिती केली आहे.
20 May 2026 05:20 PM (IST)
RRB Section Controller Exam 2026: रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेनुसार आरआरबीने सेक्शन कंट्रोलर पदांसाठी होणाऱ्या सीबीएटी (CBAT) परीक्षा २०२६ तारखेत बदल केला आहे. आरआरबीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सेक्शन कंट्रोलर भरती २०२६ ही ६ जून २०२६ रोजी आयोजित केली जाईल. विशेष म्हणजे २४ मे २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेत बदल करून १३ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार नवीन तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
20 May 2026 05:15 PM (IST)
Nuclear Energy Maharashtra : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ सौर आणि पवन उर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसून अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर) ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट आणि युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
20 May 2026 05:05 PM (IST)
भारतीय संघाचा आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. फॅनॅटिक स्पोर्ट्स आणि हुरुनच्या एका अहवालानुसार, विराट कोहली आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा भाग असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत अंदाजे २३० कोटी रुपये कमावले असून तो या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच, सर्व १० आयपीएल फ्रँचायझींचे एकूण वॅल्यूएशन १.६३ लाख कोटी रुपये आहे.
20 May 2026 05:03 PM (IST)
सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचे सावट आता आपल्यावरही दिसू लागले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा किती साठा शिल्लक राहिली आहे याची माहिती दिली आहे. आमच्याकडे सध्या केवळ १ महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे,” असा खळबळजनक खुलासा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाची मोठी टंचाई निर्माण होणार का, अशी भीती आता नागरिकांमध्ये पसरली आहे.
20 May 2026 04:58 PM (IST)
नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासासाठी CBIची दोन पथके गेल्या 6 दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहेत. शिवराज मोटेगावकर यांच्या संपर्कातील काही डॉक्टर आणि पालकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मोटेगावकर क्लासेसजवळील हॉस्टेलचीही तपासणी करण्यात येत असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
20 May 2026 04:47 PM (IST)
NEET पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोटेगावकर क्लासच्या पुण्यातील कार्यालयावर मोठी कारवाई करत कार्यालय सील केले आहे. या ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
20 May 2026 04:35 PM (IST)
ऑनलाइन औषध विक्रीमुळे बनावट औषधे आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार वाढत असल्याचा आरोप करत राज्यातील केमिस्ट आणि मेडिकल दुकानदारांनी संप पुकारला. अनेक ठिकाणी मेडिकल दुकाने बंद ठेवून मोर्चे काढण्यात आले. या प्रकारामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत संघटनांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
20 May 2026 04:20 PM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर निशाणा साधला आहे. देशात महागाई आणि आर्थिक समस्या वाढत असताना पंतप्रधान परदेशात भेटवस्तू देण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट भेट दिल्याच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
20 May 2026 03:55 PM (IST)
अमेरिकन काँग्रेसिशनल रिसर्च सर्व्हिस'च्या (CRS) एका अहवालानुसार, २८ फेब्रुवारी रोजी इराणशी सुरु झालेल्या युद्धामुळे आतापर्यंत इराणची ४२ विमाने नष्ट झाली आहेत किंवा त्यांना हानी पोहोचली आहे. ही आकडेवारी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आङे. या अहवालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये विशेष करुन लढाऊ विमानांचा समावेश आहे.
20 May 2026 03:45 PM (IST)
इराणसोबतच्या संघर्षाने पश्चिम आशियात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे इस्रायलच्या विमान कंपन्यांवरही परिणाम दिसू लागला आहे. इस्रायलच्या सरकारी विमान कंपनी एल अल ने दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे ६७ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, इराणसोबतच्या संघर्षादरम्यान इस्रायलची हवाई हद्द व्यावसायिक उड्डाणासाठी बंद होती. ज्यामुळे प्रचंड तोटा झाला आहे.
शिवाय इंधनाचड्या वाढत्या किमती आणि डॉलरचे अवमूल्यनाचाही परिणाम यावर झाला आहे. कंपनीच्या महसुलात २७ टक्क्यांनी घट होऊन तो ५६२ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला. एल अलने स्पष्ट केले की, या संघर्षामुळे कंपनीला एकूण १४५ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. येत्या काळात युद्ध न थांबल्यास आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
20 May 2026 03:35 PM (IST)
जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यातील तणाव एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि इराणसोबतच्या वाटाघाटींमधील प्रमुख चेहरा असलेले जे.डी. व्हान्स यांनी तेहरानला अत्यंत कठोर भाषेत इशारा दिला आहे. व्हान्स यांच्या मते, इराणसोबतच्या लष्करी संघर्षाची शक्यता अजून संपलेली नाही. जर इराणने शांतता करारासाठी पुढाकार घेतला नाही, तर आखाती प्रदेशात अण्वस्त्रांची नवी आणि विनाशकारी स्पर्धा सुरू होईल, ज्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली की, “आम्हाला शांतता हवी आहे, पण कराराशिवाय पर्याय नाही. वाचा सविस्तर
20 May 2026 03:25 PM (IST)
पाकिस्तानमध्ये भीषण विमान अपघात घडला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिकांनी विमानातून बाहेर पॅराशूटच्या मदतीने उडी घेतल्याने सुखरुप बचावले आहेत.
20 May 2026 03:15 PM (IST)
कॉंगोत इबोला विषाणूच्या एका नवीन आणि अत्यंत धोकादायक प्रकारामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विषाणूमुळे ५०% मृत्यूदर वाढला आहे. यामुळे WHO ने आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
20 May 2026 03:10 PM (IST)
बांग्लादेशने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर २-० ने पराभव करत सूपडा साफ केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच बांग्लादेशने पाकिस्तानचा क्लीन स्वीप करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात ८ मे रोजी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. ढाका येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा १०४ धावांनी पराभव करत १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर, सिल्हेट येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानला ७८ धावांनी पराभूत करुन मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटस टेबलमध्ये बांग्लादेशला आघाडी मिळाली तर भारताला मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर
20 May 2026 03:05 PM (IST)
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका २४ वर्षीय विवाहिते महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या पती आणि सासूकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मूत महिलेच्या पतीला आणि सासूला अटक केली आहे. घडलेली घटना कर्नाटक येथील बल्लारी येथे घडली. वाचा सविस्तर
20 May 2026 02:59 PM (IST)
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला नवीन स्वरूपात मजबूत करत आहे. आता सरकारने एनटीए (NTA) मध्ये चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये संयुक्त सचिव (Joint Secretary) आणि दोन संचालक (Director) दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहेत. या नवीन नियुक्तीसोबतच टिक्निकल, फायनान्स (finance) आणि एचआर (hr) या विभागांसाठी स्वतंत्र तज्ञ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया काढली आहे.
20 May 2026 02:50 PM (IST)
पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार झाला आहे. यात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. जुन्या वादातून फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांनी दिली
20 May 2026 02:40 PM (IST)
राज्यातील 3 हजारांहून अधिक धरणांमध्ये सरासरी 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 44.39 टक्के साठा असून, पुणे विभागात सर्वांत कमी पाणी उरले आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये फक्त 25.26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
20 May 2026 02:32 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राजनैतिक दौरे सहसा अत्यंत गंभीर, औपचारिक आणि नियमांनी बांधलेले असतात. पण जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आमनेसामने येतात, तेव्हा वातावरण हलकेफुलके आणि मैत्रीपूर्ण होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि कमालीच्या रंजक घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांना चक्क भारताची प्रसिद्ध ‘मेलडी’ (Melody) टॉफी भेट दिली आहे. या गोड भेटीचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी सोशल मीडिया डोक्यावर घेतला आहे.
20 May 2026 02:21 PM (IST)
सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. रोजचा ऑफिसचा प्रवास असो किंवा कुठे ट्रिपला जायचे असो इंधन भरताना खिशाला चांगली कात्री लागत आहे. यामुळे लोकांच्या चिंतेते वाढ झाली असून जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या किंवा इलेक्ट्रिक गाड्या खरेदीचा कल वाढला आहे. पण नवीन गाडीवर लाखो खर्च करणे अनेकांना शक्य नाही. याऐवजी तुम्ही आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयींमध्ये बदल केले तर जुनी कारसुद्धा उत्तम मायलेज देईल.
20 May 2026 02:10 PM (IST)
जागतिक परिस्थिती बिकट होत चालली असताना नवं संकट सगळ्यांसमोर उभं राहत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट पसरली आहे. कर्मचारी कपातीचा नुसता उल्लेख जरी झाला, तरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेकदा काटा येतो. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ही बाब भयानक आहे. या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात मोठी कॉफीहाऊस आणि रोस्टरी चैन असलेल्या ‘स्टारबक्स’ने अमेरिकेतील कर्मचारी कपातीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
20 May 2026 02:01 PM (IST)
सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचे सावट आता आपल्यावरही दिसू लागले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा किती साठा शिल्लक राहिली आहे याची माहिती दिली आहे. आमच्याकडे सध्या केवळ १ महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे," असा खळबळजनक खुलासा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाची मोठी टंचाई निर्माण होणार का, अशी भीती आता नागरिकांमध्ये पसरली आहे.
20 May 2026 01:55 PM (IST)
भारतीय महामार्गांवरील प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी, सरकार एक नवीन एआय-आधारित टोल प्रणाली लागू करत आहे. या प्रणालीअंतर्गत, जुने टोल प्लाझा आणि अडथळे हळूहळू हटवले जातील आणि त्यांच्या जागी कॅमेरे, सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) तंत्रज्ञान बसवले जाईल. वाहनांना आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही; त्याऐवजी, प्रणाली आपोआप वाहनाची ओळख पटवून थेट टोल कापेल. या नवीन प्रणालीला मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग प्रणाली म्हटले जात आहे.
20 May 2026 01:45 PM (IST)
‘Gana Dhav Re’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तिभाव यांना केंद्रस्थानी ठेवून उलगडणारी एक हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. B-Live Productions प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, नूतन जैन, चैतन्य राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच अत्यंत भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला. प्रारंभी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन संपूर्ण टीमने या नव्या प्रवासाची सुरुवात केली. श्रद्धा, संस्कृती आणि भावनांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि भावनिक अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
20 May 2026 01:35 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या अंतर्गत बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. कधी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या, तर कधी नाराजी नाट्याच्या.दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही नेते नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नावे नसल्यामुळे दोन्ही नेते नाराज आहेत. त्यातच या दोन्ही नेत्यांना पक्षात डावललं जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. या चर्चा ताज्या असतानाच आता शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीतून नाराजीची चर्चा समोर आली आहे.
20 May 2026 01:25 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या निष्पाप दिव्यांग चिमुरड्याची त्याच्याच जन्मदात्या आई-वडिलांनी निर्घुण हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्या घटनेने परिसरात खडबडून आली असून संताप व्यक्त केला जात आहे.
20 May 2026 01:12 PM (IST)
टेक जायंट कंपनी गुगलने Google I/O 2026 ईव्हेंटदरम्यान अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच काही नवीन फीचर्स आणि प्रोडक्ट्स देखील सादर केले. ईव्हेंटदरम्यान डीपमाइंडचे सिईओ डेमिस हसाबिस यांनी Gemini Omni सादर करत यूजर्सना मोठं सरप्राईज दिलं. याशिवाय कंपनीने यूजर्ससाठी Gemini 3.5 सीरीजचे मॉडेल्स देखील सादर केले. यावेळी यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली होती.
20 May 2026 12:50 PM (IST)
आपल्या देशातील अनेक शहरे त्यांच्या विशिष्ट ओळखीसाठी प्रसिद्ध आहेत. पण येथे एक सिटी अशी आहे, ज्याला लोक प्रेमाने ‘ऑरेंज सिटी’ (संत्र्यांचे शहर) या नावाने ओळखतात. येथे सर्वत्र संत्र्यांच्या बागा पहायला मिळतात. तसेच येथून दरवर्षी लाखो टन संत्री देशभरात पाठवली जातात. विषेश म्हणजे हे शहर केवळ चवदार संत्र्यांसाठी नाही तर शेती आणि व्यवसायासाठी ही ओळखले जाते. हिवाळ्यात इथल्या संत्र्यांच्या बागा सुगंधाने भरून जातात. चला तर मग जाणून घेऊया या ऑरेज सिटिबद्दल
20 May 2026 12:45 PM (IST)
आज (20 मे 2026) देशभरात औषध विक्रेते संपावर आहेत. फार्मासिस्ट, केमिस्ट आणि औषध वितरकांची संघटना असलेल्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) ने हा संप पुकारला आहे. देशभरातील १५ लाखांहून अधिक औषध विक्रेते बुधवार, २० मे रोजी आपली औषध दुकाने बंद ठेवतील. या संपामागे काय कारण आहे? यावर त्यांचे काय आक्षेप आहेत आणि सरकारकडे त्यांच्या काय मागण्या आहेत? अधिक तपशीलवार जाणून घ्या.
20 May 2026 12:40 PM (IST)
पदवीधर होण्याचा आनंद फार मोठा असतो. यानंतर आपले नव्या आयुष्याला सुरुवात होणार असते. अधिकतर लोक आपल्या ग्रॅज्यूएशनचा आनंद मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत साजरा करतात पण अलिकडे मात्र एका तरुणीने काहीतरी अजबच करुन दाखवले आहे. आपल्याला डिग्री मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणीने एक सुंदर फोटोशूट केले खरे पण कुणासोबत तर धोकादायक पाण्याच्या राक्षसासोबत… होय, हे खरे आहे.
20 May 2026 12:30 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का देत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत जाणे, अपुरे भांडवल, तसेच बँकिंग नियमांचे गंभीर उल्लंघन या कारणांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
20 May 2026 12:19 PM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेले पुण्यातील गँगवॉर पुन्हा उफाळून आले आहे. बालाजीनगर बस स्टँड परिसरात आंदेकर टोळीकडून आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
20 May 2026 12:00 PM (IST)
इंडियन प्रीमियर लीग केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहिली जाते. त्यामुळे, सामन्यादरम्यान तुम्ही जे काही करता किंवा बोलता ते दुर्लक्षित राहू शकत नाही. म्हणूनच खेळाडूंनी बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी नेहमी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर, लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असे काही बोलला ज्यामुळे तो ट्रोल होत आहे
20 May 2026 11:55 AM (IST)
नागपूर जिल्ह्यातील ईसापुरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक आणि मालक जखमींना सोडून फरार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
20 May 2026 11:50 AM (IST)
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हणजेच एसबीआयमध्ये मोठ्या प्रमाणात अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेद्वार 8 जूनपर्यंत एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टल sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेच्या माध्यमातून 7,150 रिक्त जागा भरण्याचे एसबीआयचे उद्दिष्ट आहे. या भरती मोहिमेअंतर्गत उमेद्वारांना एक वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रतिमहिना 15,000 रुपये विद्यावेतन मिळेल.
20 May 2026 11:41 AM (IST)
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने विवाहित महिलांच्या असुरक्षिततेवर भाष्य करणारा एक मोठा संदेश शेअर केला आहे. ग्रेटर नोएडा आणि भोपाळमध्ये अलीकडेच दोन महिलांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट आली आहे, ज्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळ आणि अत्याचाराचा आरोप केला होता. आपल्या पोस्टमध्ये, तिने महिलांना स्वतंत्र होण्याचे आणि लग्नाआधी करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.
20 May 2026 11:05 AM (IST)
IPL 2026 च्या RR vs LST सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९३ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. वैभवने आपल्या खेळीत केवळ ३८ चेंडूंचा सामना केला, ज्यात १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. जेव्हा त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा त्याने एका अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.
20 May 2026 10:55 AM (IST)
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये शुभमन गिलकडे वनडे (एकदिवसीय) आणि कसोटी (Test) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर कसोटी उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती केली आहे तर वनडे सामन्यामध्ये ही जबाबदारी श्रेयश अय्यर सांभाळणार आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का टीम इंडियाच्या कर्णधाराला किती पगार मिळतो? चला तर मग जाणून घेऊया.
20 May 2026 10:45 AM (IST)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार एनटीआर ज्युनियरने आपल्या चाहत्यांना वाढदिवसाची एक अशी भेट दिली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘ड्रॅगन’ या चित्रपटाची पहिली झलक अखेर प्रदर्शित झाली असून, प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एनटीआर आणि ब्लॉकबस्टर दिग्दर्शक प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
20 May 2026 10:35 AM (IST)
Free Fire MAX मध्ये एक नवीन लक रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक विविध ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईमोट्सद्वारे प्लेअर्स गेममध्ये भावना व्यक्त करू शकतात. प्रत्येक ईमोटमध्ये एक यूनिक अॅक्शन अॅनिमेशन पाहायला मिळतं. पण सहसा प्लेअर्सना हे ईमोट्स खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र गेममध्ये सुरु असलेल्या ईव्हेंटद्वारे प्लेअर्स अत्यंत कमी डायमंड्सचा वापर करून ईमोट्स अनलॉक करू शकणार आहेत.
20 May 2026 10:25 AM (IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी (१९ मे) संध्याकाळी इटलीत दाखल झाले आहे. हा त्यांचा पाच युरोपीय देशांच्या दौऱ्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधानव मोदी इटलीत पोहोचताच खास स्वागत केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी शेअर करत स्वागत केले आहे.
20 May 2026 10:00 AM (IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इराणबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. युद्ध लवकरच संपेल असे संकेत देतानाच ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, “आम्हाला युद्धाची वेळ येऊ नये, अशी इच्छा आहे. मात्र, गरज पडल्यास इराणला पुन्हा मोठा झटका द्यावा लागू शकतो,” असे म्हटल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणवरील संभाव्य कारवाईबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून जागतिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, संभाव्य हल्ल्याची कोणतीही अधिकृत तारीख निश्चित झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
20 May 2026 09:55 AM (IST)
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादात सापडल्याचे समोर आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी चिमुरडीचा डोळ्याच्या शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव प्रियदर्शनी बागडे असे आहे. प्रियदर्शनीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. येथे तिच्यावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला काही दिवसांनी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.
20 May 2026 09:50 AM (IST)
Valmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड गेल्या अनेक महिन्यांपासून बीडच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले असून कारागृहातच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला सलाईन लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भातील या घडामोडीमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.
20 May 2026 09:45 AM (IST)
अकोला: अकोला येथून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने एका तरुणीवर प्रेमाचे नाटक करून लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वर्षापासून सलग अत्याचार आणि फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले तोच व्यक्ती आधीपासून विवाहित असल्याचे समोर आले आहे. जेव्हा ही माहिती तिच्या समोर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अखेर त्या तरुणाला पोलीस कोठडी झाली आहे.
20 May 2026 09:40 AM (IST)
International HR Day 2026 : सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगतात कोणत्याही कंपनीची किंवा संस्थेची प्रगती केवळ तिथल्या तंत्रज्ञानावर किंवा उत्पादनांवर अवलंबून नसते, तर ती तिथल्या माणसांवर अवलंबून असते. या माणसांना शोधणे, त्यांना कंपनीच्या संस्कृतीशी जोडणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्याचे सर्वात मोठे काम पडद्यामागून एक टीम करत असते, ती म्हणजे ‘मानव संसाधन’ म्हणजेच ह्युमन रिसोर्स (HR) टीम. याच एचआर व्यावसायिकांच्या बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २० मे रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव संसाधन दिन’ (International HR Day) साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका पदाचा सण नाही, तर कार्यस्थळाला मानवी चेहरा देणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे.
20 May 2026 09:35 AM (IST)
PM Modi Italy Visit May 2026 : जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यात नव्या ‘G2’ समीकरणाची चर्चा रंगत असतानाच, भारताने युरोपच्या भूमीवर आपली सामरिक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या पाच देशांच्या महत्त्वपूर्ण युरोप दौऱ्याचा अंतिम आणि सर्वात हाय-प्रोफाइल टप्पा म्हणून इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित केलेला हा दौरा पंतप्रधान मोदींचा इटलीचा पहिला अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. मोदींचे विमान रोममध्ये उतरताच मेलोनी यांनी सोशल मीडियावर मोदींसोबतचा एक खास सेल्फी पोस्ट केला. “रोममध्ये स्वागत आहे, मित्रा,” असे कॅप्शन असलेल्या या सेल्फीने अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, या दोन जागतिक नेत्यांमधील दृढ मैत्रीचे संकेत दिले आहेत.
20 May 2026 09:30 AM (IST)
Paytm Pocket Money Feature: किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ (Paytm) ने नवे ‘पेटीएम पॉकिट मनी’ हे फीचर लाँच केले आहे. आता किशोरवयीन मुले स्वतःचे बँक अकाऊंट न उघडता देखील डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. या नव्या फीचरमुळे पालक मुलांना त्यांच्या खर्चावर लक्ष आणि नियंत्रणही ठेवता येणार आहे.






