सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : बारामतीच्या माजी नगराध्यक्ष भारती राजेंद्र मुथा यांना दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाचे मराठी लोकप्रिय दैनिक नवराष्ट्र च्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन मध्ये बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते व प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार भारतीय मुथा यांना प्रदान करण्यात आला.
भारती मुथा यांनी गेले अनेक वर्ष बारामतीचे नगरसेवक म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. बारामती नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. बारामतीचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ राजेंद्र मुथा यांच्या त्या पत्नी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांना नवराष्ट्र च्या वतीने सुपर वुमन अवॉर्ड 2025 या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुथा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा मिळालेला सन्मान बारामतीकरांचा गौरव आहे. नवराष्ट्रने मला हा जीवनगौरव पुरस्कार सन्मानित केला, याबद्दल मी नवभारत वृत्तपत्र समूहाचे आभार मानते, असे भारती मुथा यांनी बोलताना सांगितले.