काय आहे आजच्या ठळक घडामोडी
20 Apr 2026 11:30 AM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते.दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगर रोडवरून जात असतांना श्रीकांत शिंदे यांनी ऊसाचा रस पिण्यासाठी ताफा थांबवला.भलामोठा ताफा नेते पोलीस बघून रसवंती चालक गोंधळून गेला.चालकाची अडचण लक्षात घेऊन आ.अर्जुन खोतकर यांनी स्वतः मशीनवर रस तयार करून श्रीकांत शिंदे यांना दिला.यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे देखील उपस्थित होते.
20 Apr 2026 11:25 AM (IST)
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या एक अत्यंत स्फोटक खेळ सुरू आहे. ओमानचा समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी आता केवळ पाण्याचे मार्ग राहिलेले नाहीत, तर ते अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील महासंग्रामाचे रणांगण बनले आहेत. अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज जप्त करण्याची चूक केली आणि इराणने काही तासांतच आकाशातून मृत्यूचा पाऊस पाडत अमेरिकन नौदलावर थेट ड्रोन हल्ले केले. या घटनेने केवळ आखाती देशांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेचे वारे वाहत असतानाच, प्रत्यक्ष समुद्रात मात्र युद्धाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत.
20 Apr 2026 11:20 AM (IST)
पश्चिम आशियात अमेरिका इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी जगाची चिंता वाढवली आहे. उत्तर कोरियाने जपानवर एकाच वेळी अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे. दुसरीकडे क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी देखील केली आहे. यामुळे जपानची चिंता वाढली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
20 Apr 2026 11:15 AM (IST)
महाराष्ट्राला प्रचंड कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला 40 अंश पार चढलेला उन्हाच्या पाराने सर्वांच्या जीवाची लाही केली आहे. तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. मागील पाच दिवसांपासून उन्हाचा चटका जोरदार वाढलेला असताना कालपासून राज्यात हवामान (IMD Weather Update) बदल झाला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असून पूर्वमौसमी पावसाला पोषक असे हवामान तयार झाले आहे.
20 Apr 2026 11:08 AM (IST)
टेक कंपनी गुगलने त्यांच्या जेमिनी अॅपसाठी एका नव्या अपडेटची घोषणा केली आहे. या नव्या अपडेटमुळे आता AI इमेज जनरेशन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकते. कंपनीने सांगितलं आहे की, एआय प्लॅटफॉर्म Gemini आता यूजरच्या इंटरेस्ट्स, प्रेफरेंस आणि गुगल फोटोज लाइब्रेरीमधील सेव्ड फोटोजच्या आधारावर ईमेज क्रिएट करू शकणार आहे.
20 Apr 2026 11:02 AM (IST)
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोट दुखीची तक्रार घेऊन एक एक अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी आली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. तपासणीत ती पाच महिनयांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीची विचारपूस केली असता ति राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
20 Apr 2026 10:52 AM (IST)
सातत्याने लक्ष्याचा पाठलाग करण्यात माहिर असलेल्या पंजाब किंग्सने प्रियांश आर्या आणि कूपर कॉनोली यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर न्यू चंदीगडमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एक विक्रम मोडणारी कामगिरी केली. श्रेयस अय्यरच्या संघाने २५४ धावांचा डोंगर उभा केला आणि ऋषभ पंतच्या संघाचा ५४ धावांनी पराभव केला. पंजाब किंग्सने या सामन्यात पाच विक्रम रचले, त्यापैकी एक म्हणजे सलग सहा सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम.
20 Apr 2026 10:42 AM (IST)
एक असा हुकूमशाह ज्याच्या नावाने आजही दहशत निर्माण होते तो म्हणजे अॅडॉल्फ हिटलर. नाझीचा नेता असलेला अॅडॉल्फ हिटलर याचा आजच्या दिवशी 1889 साली जन्म झाला. ऑस्ट्रियातील ब्राउनाऊ आम इन हे त्याचे जन्मस्थान असून त्याने अत्यंत अमानूष हत्या केल्या. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीतील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा फायदा घेत त्याने आपली सत्ता मजबूत केली.
20 Apr 2026 10:32 AM (IST)
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, हिरोगिरी दाखवण्यासाठी आणि रिल बनवण्यासाठी आजकालचे तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचा एक भीषण प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्यप्रदेशातील असल्याचा दावा केला जात आहे. नॅशनल हायवेवर वेगाने बाईक चालवणाऱ्या तरुणांना स्टंटबाजी जीवावर बेतली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत, तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
20 Apr 2026 10:22 AM (IST)
मध्य-पूर्वेतील राजकारण सध्या एका अत्यंत नाजूक वळणावर येऊन ठेपले आहे. एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (benjamin netanyahu) यांनी अत्यंत आक्रमक विधान करून या चर्चेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नेतान्याहू यांनी इराणला जगातील ‘रानटी’ आणि दहशतवादी शक्ती संबोधले असून, इस्रायलची ही लढाई पाश्चात्य संस्कृती वाचवण्यासाठी सुरू असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
20 Apr 2026 10:12 AM (IST)
एप्रिल महिन्यापासून उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसह १५ राज्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसह सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भ, तसेच छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये तीव्र उष्णतेची लाट आणि मेघगर्जनेसह पावसासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
20 Apr 2026 10:04 AM (IST)
२० एप्रिल रोजी आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांच्या आधारे, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज सोमवारी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १०८ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४७६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. कसे आहे आजचे मार्केट घ्या जाणून
20 Apr 2026 10:03 AM (IST)
अमेरिका इराण युद्धाने (US Iran War) आता तीव्र पेट घेतला आहे. ओमानच्या आखातात इराणचे एक मालवाहू जहाज अमेरिकेने जप्त केले आहे. यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणच्या हजरत खातम अल-अनबिया लष्करी मुख्यालयाने याची पुष्टी केली आहे. इराणने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेघ केला आहे. याचा सूड घेण्याची धमकीही इराणने अमेरिकेला दिली आहे. वाचा सविस्तर
20 Apr 2026 10:02 AM (IST)
एप्रिल महिन्यापासून उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसह १५ राज्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसह सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भ, तसेच छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये तीव्र उष्णतेची लाट आणि मेघगर्जनेसह पावसासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाचा अधिक
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले असून दुहेरी त्रास सहन करावा लागला आहे. मुंबईची लाइफलाइन असणारी मुंबई लोकलबाबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणारी एक डाऊन स्लो लोकल रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. तर दुसरी घटना म्हणजे पनवेल स्थानकात प्रवाशांनी भरलेली लिफ्टच खाली कोसळली. या दोन्ही घटनांचा रेल्वे वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. वाचा अधिक माहिती






