शौर्यवान राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असलेले संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. महाराणी सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच मराठी, संस्कृत, फारसी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांची विद्वत्ता केवळ राजकीय किंवा युद्ध कौशल्यातच नव्हे, तर साहित्यिक क्षेत्रातही प्रखरपणे दिसून येते. ‘बुधभूषण’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून, तो त्यांच्या विद्वानतेचे प्रतीक मानला जातो. आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. केवळ मराठा इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा