भारताचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्मा त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे. भारतीय टीमचा कॅप्टन असलेला रोहित शर्मा देखील जगात प्रसिद्ध आहे. फक्त भारतामध्ये नव्हे तर जगभरामध्ये रोहितचे चाहते आहेत. हिटमॅन म्हणून ओळख मिळवलेल्या रोहित शर्माने आपले नेतृत्व सिद्ध करत भारतीय संघाकडे विजयश्री खेचून आणला आहे. रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतके जमा आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. तो भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. आज सर्वांचा लाडका रोहित शर्मा त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
30 एप्रिल रोजी जगाच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
30 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
30 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष
1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली.
1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
1945 : ‘अॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.