आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये 1972 मध्ये सिमला करार झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आला होता तो म्हणजे सिमला करार. आजच्या दिवशी 1972 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिमला करार झाला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षरी केली होती. 1971 ची लढाई झाल्यानंतर झालेल्या या सिमला करारामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे, दोन्ही देशांनी कोणत्याही वादाचे निराकरण द्विपक्षीय चर्चेद्वारे करणे आणि नियंत्रण रेषा (Line of Control – LOC) दोन्ही देशांनी मान्य केली आणि ती बदलण्याचा प्रयत्न न करणे अशा अनेक घटना यामध्ये मान्य करण्यात आल्या आहेत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा