Hot and Spicy Food Day 2026: 6,000 वर्षांचा इतिहास आणि जिभेला चटके; 16 जानेवारीचा दिवस खाद्यप्रेमींसाठी का आहे खास? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
International Hot and Spicy Food Day 2026 : जर तुम्हाला जेवणात ‘झणझणीत’ तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ किंवा तिखटजाळ करी आवडत असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज संपूर्ण जगात ‘आंतरराष्ट्रीय गरम आणि मसालेदार अन्न दिन’ (International Hot and Spicy Food Day) साजरा केला जात आहे. थंडीच्या दिवसात शरीरात उबदारपणा निर्माण करणाऱ्या आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या मसालेदार पदार्थांचा हा अनोखा उत्सव आहे.
मसाल्यांचा वापर मानवी संस्कृतीत काही नवीन नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, मसाल्यांचा वापर ६,००० वर्षांहून अधिक काळापासून केला जात आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीत हिप्पोक्रेट्सने मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन केले होते. भारतात तर आयुर्वेदाच्या माध्यमातून हळद, मिरी आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांचा वापर हजारो वर्षांपासून आजार बरे करण्यासाठी केला जातोय. १५ व्या शतकात ख्रिस्तोफर कोलंबसने ‘मिरची’चा शोध लावल्यानंतर जागतिक खाद्यसंस्कृतीत तिखटपणाची एक नवी क्रांतीच आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: तिसऱ्या महायुद्धाची घंटा वाजली! ‘आता अण्वस्त्रेच चालणार…’ रशियाने जर्मनी आणि ब्रिटनला दिला धोक्याचा ठळक संदेश
मसालेदार अन्न केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. मिरचीमध्ये असलेले ‘कॅपसायसिन’ हे घटक शरीरातील कॅलरीज जाळण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त:
Too hot to behave…and too good to resist. 🔥🌶️ Turn up the heat with Red Cow Red Chilli Sauce this International Hot & Spicy Food Day.#InternationalHotandSpicyFoodDay #SpiceLovers #RedCowDairy #KolkataCity #Foodies pic.twitter.com/mX5ntGPPqJ — Red Cow Dairy (@redcowdairykol) January 16, 2026
credit – social media and Twitter
जगभरात हा दिवस साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत. अनेक ठिकाणी ‘मिरची खाण्याची स्पर्धा’ (Chili Eating Contest) आयोजित केली जाते. काही लोक आजच्या दिवशी आपल्या आवडीच्या मेक्सिकन, थाई किंवा भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन ‘स्पायसी’ डिशचा आस्वाद घेतात. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरीच एखादा नवा मसालेदार पदार्थ बनवून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Arctic War: आर्क्टिकमध्ये NATO सक्रिय; मॅक्रॉन यांनी ट्रम्पला दाखवला लष्करी इंगा, लवकरच रशियाही घेणार उडी
तिखट खाण्याचे फायदे असले तरी, त्याचे अतिसेवन पोटाच्या समस्या निर्माण करू शकते. ज्यांना पित्त (Acidity) किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी मर्यादेतच मसालेदार पदार्थांचे सेवन करावे. मात्र, योग्य प्रमाणात घेतलेले मसाले हे अन्नाची चव आणि तुमचे आरोग्य दोन्ही सुधारू शकतात.
Ans: हा दिवस दरवर्षी १६ जानेवारी रोजी जगभरात साजरा केला जातो.
Ans: तिखट पदार्थांमुळे चयापचय शक्ती (Metabolism) वाढते, वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
Ans: सध्या 'कॅरोलिना रीपर' (Carolina Reaper) ही जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते, तिचे तिखटपण स्कोव्हिल स्केलवर मोजले जाते.






