Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता काय करणार ट्रम्प? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करस्पॉंडंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अनेक नामवंत व्यक्त उपस्थित होते. दरम्यान कॅलिफोर्नियाच्या टॉरेंस येथील एका रहिवाश्याने अचानक पार्टीत घुसखोरीचा प्रयत्न केला.
यावेळी त्याला सुरक्षा दलांनी रोखले. मात्र आरोपीने थेट सीक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली. सुदैवाने सुरक्षा एजंटने बुलेटप्रूफ जॅकेटमुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर सुरक्षा दलांनी तातडीची कारवाई करत आरोपी एलनला जमिनीवर पाडले आणि अटक केली.
दरम्यान सोमवारी (११ मे) ३१ वर्षीय आरोपी कोल थॉमस एलन याला वॉशिंग्टन डी.सी येथील फेडरल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न आणि सीक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीबाराच्या आरोपाखाली खटला सुरु होता. मात्र आरोपी ॲलनने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. यामुळे ट्रम्प सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांना ॲलनबद्दल मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी होती. ॲलनने यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता, तर तो एक अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित तरुण आहे.






