'हे' आहे जगातील सर्वात महाग चलन; डॉलरपेक्षा तीन पट अधिक मूल्यवान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : जगभरातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये केले जातात, त्यामुळे अनेकांना डॉलर हेच सर्वात महागडे चलन असल्याचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात जगातील सर्वात महागडे चलन अमेरिकन डॉलर नसून कुवैती दिनार (KWD) आहे. कुवैती दिनाराची किंमत सध्या भारतीय रुपयाच्या तुलनेत तब्बल ₹283.35 प्रति दिनार आहे, तर डॉलर केवळ दहाव्या स्थानावर आहे.
कुवैती दिनार का आहे सर्वात मौल्यवान?
कुवैती दिनाराचे मूल्य इतके जास्त असण्यामागे अनेक आर्थिक कारणे आहेत. तेलसंपत्तीने समृद्ध असलेला कुवेत हा आखाती देश आर्थिकदृष्ट्या स्थिर असून, त्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. तसेच, करमुक्त व्यवस्था आणि मजबूत आर्थिक धोरणांमुळे कुवैतचे चलन अत्यंत शक्तिशाली आहे. कुवेतमध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांसाठी जातात, कारण तिथे सरासरी पगारही खूप जास्त आहे. त्यामुळे तिथे काम करणारे अनेक भारतीय रोजगाराच्या संधींमुळे उच्च उत्पन्न मिळवतात आणि भारतात आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगावर युद्धाची टांगती तलवार! रशियाचा गंभीर इशारा, होऊ शकते ‘अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये युद्ध’
1000 कुवैती दिनार म्हणजे तब्बल 3 लाख रुपये
जर एखाद्या व्यक्तीने कुवेतमध्ये दरमहा 1000 KWD कमावले, तर भारतीय चलनात त्याचे मूल्य तब्बल ₹2,83,354 (सुमारे तीन लाख रुपये) होते. यामुळे, कुवेतमध्ये काम करणारा भारतीय सहज लक्षाधीश होऊ शकतो.
कुवेतमधील सरासरी मासिक पगार:
आयटी अभियंता – 626 KWD प्रति महिना
स्नातक (पदवीधर) – 500 KWD प्रति महिना
कुशल भारतीय कामगार – 1,260 KWD प्रति महिना
उच्चश्रेणीतील भारतीय कर्मचारी – 5,640 KWD प्रति महिना
दिनार फक्त कुवेतमध्येच नाही, तर या देशांमध्येही प्रचलित
दिनार हे फक्त कुवेतचे अधिकृत चलन नाही, तर बहरीन आणि जॉर्डन या दोन अरब देशांचेही मुख्य चलन आहे. मात्र, कुवैती दिनाराचे मूल्य सर्वाधिक आहे.
जगातील टॉप ५ सर्वात महाग चलने:
भारतीयांसाठी आखाती देश का आहेत रोजगाराचे मोठे केंद्र?
भारतामधून दरवर्षी लाखो लोक नोकरीसाठी आखाती देशांकडे स्थलांतर करतात. यामध्ये कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हे देश प्रामुख्याने प्राधान्याने निवडले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump and Israel : अमेरिकेचा इस्रायलशी मोठा करार, लष्करी ताकद वाढणार; मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकण्यास मान्यता
जगातील सर्वात महागडे चलन
कुवैती दिनार हे जगातील सर्वात महागडे चलन असून, ते डॉलरपेक्षा तीन पटीने अधिक मूल्यवान आहे. तेलसंपत्ती आणि आर्थिक स्थैर्यामुळे कुवेतचे चलन सर्वाधिक शक्तिशाली बनले आहे. अनेक भारतीय उच्च पगाराच्या संधींमुळे कुवेत आणि अन्य आखाती देशांमध्ये कामासाठी जातात. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही या चलनाचा अप्रत्यक्षपणे मोठा प्रभाव पडतो.