• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Trishunda Ganapati Mandir Pune Talghar Open On Gurupourima Information In Marathi

संपूर्ण पाण्याने भरलेले तळघर; ‘या’ मंदिराचे वर्षातून केवळ एकदाच उघडतात समाधी दर्शनाचे दरवाजे

Trishunda Ganapati Mandir : पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराला तळघर असून ते केवळ वर्षांच्या एकाच दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडते.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 10, 2025 | 07:35 PM
trishunda ganapati mandir pune talghar open on gurupourima information in marathi

केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी तळघर खुले होणार त्रिशुंड गणपती मंदिर (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Trishunda Ganapati talghar on gurupourima : प्रिती माने : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये अनेक वैभवशाली मंदिरांचा इतिहास दडला आहे. या भागामध्ये भगवान शिव आणि गणरायाची मंदिरे आहेत. यातील असेच एक 17 व्या शतकातील नयनरम्य मंदिर म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर. स्थापत्य कलेचा आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्रिशुंड गणपती मंदिर ओळखले जाते. या मंदिराला तळघर असून हे तळघर केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते.

सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिर हे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. मंदिराच्या कोरीवासह मंदिराखाली असलेल्या तळघराविषयी देखील सर्वांना उत्सुकता आहे. मंदिर जेवढे वरती सुंदर आहे तितकेत शांत या मंदिराचे तळघर आहे. त्रिशुंड गणेशमूर्तीच्या अगदी खाली दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. संपूर्णवेळ पाण्यामध्ये असणाऱ्या या तळघराचे दरवाजे वर्षातून एकदा केवळ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उघडण्यात येतात. हजारो भाविकांनी आजच्या दिवशी दर्शनासाठी त्रिशुंड गणपती मंदिराबाहेर गर्दी केली होती.

पाण्याने भरलेले तळघर

मंदिराच्या तळघराला जाण्यासाठी सभामंडपातून दरवाजे आहेत. एक ते दीड फुटी पायऱ्यांनी खाली उतरुन तळघरामध्ये जाता येते. तळघर हे गुडघापर्यंत पाण्याने भरलेले असते. तळघराच्या दगडांमधून जीवंत झरा वाहत असतो. या पाण्यातून तळघर हे नेहमी पाण्यामध्ये असते. तळघराच्या छतावर देखील दगडी झुंबर कोरण्यात आलेले आहे. त्याचबरोबर योग साधना करण्यासाठी तळघरामध्ये वेगळी खोली असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तळघरातून पायऱ्या वर चढून गेल्यानंतर दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. या समाधीवर देखील छोटा दगडी गणराय असल्याचे दिसून येते. मंदिराचे तळघर हे पाण्याने भरलेले थंडगार असून मनाला शांत करते. गजबजलेल्या शहरामधील तळघरातील ही शांतता मनाला भावते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वी हटयोग साधना केंद्र असल्याचे सांगितले जाते. मंदिरावर कोरण्यात आलेल्या शिल्पांमध्ये देखील विविध योग साधना दाखवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणपती असून तीन सोंड असलेला हा एकमेव गणराय मानला जातो. गणपती हा मोरावर विराजमान असून त्याच्या एका मांडीवर शक्तीस्वरुप देवी विराजमान आहे. गणरायाची एक सोंड देवीच्या हनुवटीवर टेकली आहे. तर दुसरी सोंड ही दुसऱ्या हातामध्ये असलेल्या लाडूवर आहे. अत्यंत सूबक आणि काळ्या पाषाणातील गणरायाची मुर्ती मन प्रसन्न करते.

शिवमंदिराप्रमाणे मंदिराची शैली

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून वेरूळच्या कोरीव लेणीदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. 17 व्या शतकामध्ये बांधून पूर्ण झालेल्या या मंदिराचे कोरीवकाम थक्क करणारे आहे. मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराची निर्मिती केली.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

कोरीवकामाने वेधले लक्ष

त्रिशुंड गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर रेखीव द्वारपाल कोरले असून हातांमध्ये दंडक आहेत. त्याचप्रमाणे रेखीव कोरीवकामाने देवळ्या, द्वारशिखा आणि प्रवेशद्वार सजवण्यात आल्या आहे. काळ्या पाषाणात कोरीवकाम करण्यात आले असून यामध्ये गजलक्ष्मी, माकडांची रांग, महिला, गणपती, एकशेंगी गेंडा, इंग्रज सैन्य, हटयोगी साधना, बासरी वाजणारा कृष्ण, पोपट, घंटनाद, गणराय,  तसेच विठ्ठल रुक्मिमी असे नानाविध शिल्प कोरण्यात आले आहे. गुजराती पद्धतीच्या झरोके कोरण्यात आले आहे. ललाटबिंबावर गणपती आणि गजलक्ष्मी तसेच शिव पार्वती आहेत. त्याचबरोबर अनेक मानवी चेहरे असून प्रत्येक मूर्तीवरील भाव वेगळे आहेत. तसेच चंद्र, सूर्य कोरण्यात आले आहेत.

Web Title: Trishunda ganapati mandir pune talghar open on gurupourima information in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • daily news
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
1

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
2

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
3

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

पीएमपी चालकांचा निष्काळजीपणा, उद्धट वर्तनाचा प्रवाशांना त्रास; अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर
4

पीएमपी चालकांचा निष्काळजीपणा, उद्धट वर्तनाचा प्रवाशांना त्रास; अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.