फोटो सौजन्य - JioHotstar
MCL 2025 : मेजर लीग क्रिकेट 2025 चा काल शुभारंभ झाला आहे, या स्पर्धेचा पहिला सामना सुरु आहे. हा सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये खेळवला जात आहे. वॉशिंग्टन फ्रिडम या संघाने सामन्यामध्ये नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. त्याच वेळी, सीझन-३ च्या पहिल्याच सामन्यात, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा धडाकेबाज फलंदाज फिन अॅलनने शतक झळकावून इतिहास रचला.
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये पार पडलेल्या पहिल्याच सामन्यात फिन अॅलनने स्फोटक फलंदाजी करत शानदार शतक झळकावुन इतिहासात नाव कोरले आहे. फिनने फक्त ३४ चेंडूमध्ये हा पराक्रम केला आहे. यासह, फिन अॅलन मेजर लीग क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता, ज्याने २०२३ मध्ये ४० चेंडूत शतक झळकावले होते.
श्रेयस अय्यरचा फायनलमध्ये सलग दुसरा पराभव! कामगिरीवर प्रश्नचिन्ह, संघाला गरज तेव्हा…
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये मेजर प्रिमियर लीग 2025 च्या या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी राहिली यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. या सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना फिन अॅलनने फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १९ षटकार आणि ५ चौकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २९६.०८ होता. यासह, फिन अॅलन टी-२० इतिहासात सर्वात जलद शतक करणारा न्यूझीलंडचा खेळाडू बनला आहे. यापूर्वी, न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता, ज्याने ३५ चेंडूत शतक केले होते.
END OF AN ICONIC INNINGS BY FINN ALLEN IN MAJOR LEAGUE CRICKET 🥶 – 151 runs from just 51 balls including 5 fours & 19 sixes in the first match of 2025 season, one of the Greatest batting performance in T20 History. pic.twitter.com/ZhG3OaACH3 — Johns. (@CricCrazyJohns) June 13, 2025
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने २० षटकांत ५ गडी गमावून २६९ धावा केल्या. फिन अॅलन व्यतिरिक्त हसन खानने १८ चेंडूंत ३८ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता, तर संजयने २० चेंडूंत ३६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ चौकार आणि ४ षटकार निघाले. वॉशिंग्टन फ्रीडमकडून गोलंदाजी करताना जॅक एडवर्डने ४ षटकांत ३९ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले.