फोटो सौजन्य - SoBo Mumbai Falcons
सोबो मुंबई फालकोंस विरुद्ध एमएससी मराठा रॉयल्स : काल टी 20 लीग 2025 च्या फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात एमएससी मराठा रॉयल्स या संघाने सोबो मुंबई फालकोंस याचा पराभूत करून तिसऱ्या सीझनचे जेतेपद नावावर केले. श्रेयस अय्यर याला मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही फायनलच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये श्रेयस अय्यरने संपूर्ण सीझनमध्ये त्याने कमालीची कामगिरी केली होती पण फायनलच्या सामन्यात त्याने फक्त १ धाव करून विकेट गमावली. असेच काहीसे श्रेयस अय्यरसोबत टी 20 मुंबई लीगच्या या फायनलच्या सामन्यात झाले.
जेव्हा त्याची संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा तो १२ धावा करून बाद झाला आणि सोबो मुंबई फालकोंसचा मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली. दोन्ही संघाची फायनलमध्ये कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
नजमुल हुसेन शांतोचं कर्णधारपद या खेळाडूने हिसकावलं! बांग्लादेशचा एकदिवसीय क्रिकेटचा नवा कॅप्टन
मराठा रॉयल्सच्या संघाने फायनलच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोबो मुंबई फालकोंसच्या संघाने पहिले फलंदाजी करत ४ विकेट्स गमावून १५७ धावा केल्या. यामध्ये अंगकृष रघुवंशी स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त ७ धावा केल्या, तर ईशान मुलचंदानी याने २० धावांची खेळी खेळली. श्रेयस अय्यर देखील फार मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने फक्त १२ धावा केल्या आणि इरफान उमीर याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
💔#SoBoMumbaiFalcons #TheSoBoBoys #FalconsOnFire #Cricket #Mumbai #T20Mumbai #SMFvsMSCMR #FinalDay pic.twitter.com/2YtfYjbIM1
— SoBo Mumbai Falcons (@SoboMFRL) June 12, 2025
मयुरेश कैलाश तांडेल याने सोबो मुंबई फालकोंस संघासाठी अर्धशतक झळकावले पण इतर खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याने 32 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. मराठा रॉयल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार सिद्धेश लाड याने फक्त 15 धावा केल्या तर साहिल जाधव याने संघासाठी 22 धावांची खेळी खेळली. चिन्मय सुतार याने संघासाठी अर्धशतकीय खेळी खेळली. त्याने 49 चेंडुंमध्ये 53 धावा केल्या. खान नौशद याने देखील संघासाठी महत्वाच्या धावा केल्या त्याने 24 चेंडुमध्ये 38 धावा केल्या. मराठा रॉयल्सच्या संघाने हे लक्ष 19.2 चेंडुमध्ये पुर्ण केले.