कोल्हापूर : तरुणांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढत असताना आता कोल्ह्यापुरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) कुस्तीचा सराव करताना एका २३ वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अकाली निधनाने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मारूती सुरवसे (Maruti Survase) असं या मृत झालेल्या पैलवानाचा नाव असून तो पंढरपूर जवळील वाखरी येथील रहिवासी होता. अनेक वर्षापासून तो कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता.पुढे जाऊन एक मोठा पैलवान व्हावे असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सरावानंतर तो त्याच्या खोलीत आला आणि अंघोळ केल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले. मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पैलवान मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी होते. मारुतीच्या अकाली निधनाने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.