कोण होणार केकेआरचा कर्णधार? (फोटो -ians)
भारताचा अनुभवी फलंदाज आणि २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा कर्णधार, अजिंक्य रहाणेने गुरुवारी (३० जुलै) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तो आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा कर्णधार होता. दरम्यान 3 ते 4 खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत, जे आगामी हंगामात केकेआर संघाचे कर्णधार होऊ शकतात. अनुभवी खेळाडू केकेआरला शोधावा लागणार आहे.
सुनील नरेन
सुनील नरेन हा कोलकाता नाइट रायडर्सचा अत्यंत जुना आणि अनुभवी खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे नंतर केकेआर व्यवस्थापन सुनील नरेनला नवा कर्णधार करू शकते. 2012 पासून नरेन केकेआरसाठी खेळत आहे.
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. यंदा तो सपशेल अपयशी ठरला आहे. तसेच तो गुजरातचा देखील कर्णधार राहिला आहे. त्याने गुजरातला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. पुढील हंगामात हार्दिक पंड्याला ट्रेड केले गेले तर कोलकाता नाइट रायडर्स हार्दिक पांड्याला आपल्याकडे घेऊन त्याला कर्णधार करू शकते.
वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…
रिंकू सिंग
कोलकाता नाइट रायडर्स रिंकू सिंगकडे देखील संघाची कमान सोपवू शकते. उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणारा रिंकू गेल्या काही वर्षांत केकेआरचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे नाव देखील चर्चेत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना, अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला. त्याने लिहिले, “कॅप क्रमांक २७८, Signing Off. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी नेहमीच तुमचा आभारी राहीन.”






