(फोटो- ians)
रयान टेन डोशेट यांनी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. टयांनी भारतीय संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा बीसीसीआयकडे सोपवला होता. समोर आलेल्या माहितीनुसार ते आता आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रयान टेन डोशेट हे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी कार्यरत होते. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यानच रयान टेन डोशेट यांनी बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आपल्या या निर्णयाची कल्पना दिली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत असून, त्याआधीच टेन डोशेट यांनी आपला पदभार सोडला आहे.
IND vs SL: 4 दुर्दैवी खेळाडू! श्रीलंका सिरीजमधून थेट बाहेरचा रस्ता, एकाचा तर पदार्पणानंतरच पत्ता कट
रयान टेन डोशेट हे नेदारलँड्सचे माजी कर्णधार राहिलेले आहेत. रयान टेन डोशेट यांचा कोलकाता नाइट रायडर्सशी जुना आणि जवळचा संबंध राहिला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरने जेव्हा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तेव्हा ते केकेआर संघाशी संबंधित होते. रयान टेन डोशेट यांच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०२५ चे आशिया चषक आणि २०२६ चे टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले. त्यांनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागांत खेळाडूंना मार्गदर्शन केले.
IPL 2027: हार्दिक पांड्या खरंच सोडणार Mumbai Indians ची साथ? डीलपूर्वीच चर्चेत
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. तो सध्या मैदानाबाहेर असला तरी, IPL मुळे तो चर्चेत आहे. असे वृत्त आहे की, हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स सोडून सीएसके (CSK) संघात सामील होऊ शकतो. तथापि, मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्स या दोघांनीही याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. या अफवा केवळ अटकळ आहेत; अद्याप कोणतीही ठोस पुष्टी झालेली नाही.






