फोटो सौजन्य - X
PSL 2025 : भारतीय नियामक मंडळाने आज धर्मशाला येथे पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्स या दोन संघामध्ये लढत होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने बी प्राक हे परफॅार्मस करणार आहेत. ही भारतीय सशस्त्र दलांना श्रद्धांजली असणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. याचदरम्यान पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लिग 2025 ला धोका निर्माण झाला आहे असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
दोन्ही देशांच्या सैन्याने सतर्कता बाळगली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करून बदला घेतला. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२५ वर दिसून येतो.
पाकिस्तान सुपर लीगवर धोका निर्माण झाला आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग २०२५ धोक्यात येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएसएल २०२५ चे सामने लाहोर आणि रावळपिंडीहून कराचीला हलवण्यात आले आहेत. जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याचा परिणाम पाकिस्तान सुपर लीग २०२५ वर होऊ शकतो, असे मानले जाते.
The remaining matches of PSL have been shifted to Karachi. pic.twitter.com/bGEkp4VEr7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2025
पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये आतापर्यंत ३४ पैकी २४ सामने खेळवण्यात आले आहेत. पेशावर झल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यातील सामना ८ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना रालपिंडी येथे खेळला जाणार आहे. यानंतर, उर्वरित ४ सामन्यांपैकी ३ सामने रावळपिंडीमध्ये खेळवले जाणार आहेत, तर १ सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे. तथापि, हे उर्वरित सामने कराचीला हलवले जाऊ शकतात.
आयपीएल २०२५ वरही परिणाम होऊ शकतो तणावाच्या काळात, आयपीएल २०२५ वरही परिणाम होऊ शकतो. खरंतर, आयपीएल २०२५ मध्ये, ६१ क्रमांकाचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात धर्मशाळेत खेळला जाणार आहे. हा सामना धर्मशाळाहून अहमदाबादला हलवता येईल. तथापि, आयपीएलने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
BCCI करणार आज सामन्याआधी खास कार्यक्रमाचे आयोजन! भारतीय सशस्त्र दलांना अर्पण करणार श्रद्धांजली
टेलिग्राफमधील वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अहवालात असेही म्हटले आहे की इंग्लंडच्या बहुतेक खेळाडूंनी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांना सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास आहे. तथापि, इंग्लंडचे दोन खेळाडू ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड विली पाकिस्तान सोडून परत येऊ इच्छितात. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये खेळणारे अनेक परदेशी खेळाडू लवकरच आपापल्या देशात परतू शकतात असे मानले जाते. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचे खेळाडू पीएसएलमध्ये सहभागी होत आहेत.