फोटो सौजन्य - IndianPremierLeague
BCCI ने सामन्यादरम्यान केले कार्यक्रमाचे आयोजन : आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, या सामन्याचे आयोजन धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी भारतीय नियामक मंडळाने एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यादरम्यान ईडन गार्डन्सवर देशभक्तीचे एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. ऑपरेशन सिंदूर नंतर, भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ ईडन गार्डन्सवर ‘माँ तुझे सलाम’ हे गाणे वाजवण्यात आले, ज्यामध्ये चाहत्यांनी पूर्ण उत्साहाने आणि उत्कटतेने भाग घेतला आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
चाहत्यांनी संपूर्ण गाणे एका सुरात गायले आणि स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावला. आज पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होण्याआधी बॅालीवूडचे प्रिसिध्द गायक बी प्राक भारतीय सशस्त्र दलांना आज श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यासंर्दभात IndianPremierLeague च्या सोशल मिडीया अकाऊंटवर माहिती शेअर केली आहे.
IndianPremierLeague च्या सोशल मिडीया अकाऊंटवर लिहीले आहे की, धर्मशाळा, अभिमानाने गाण्यासाठी सज्ज व्हा! देशभक्तीच्या रात्री बी प्राक देशाचा आवाज घेऊन येत आहेत आणि भारताच्या आत्म्याचे प्रतिध्वनी करणारे स्वर तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. भावपूर्ण सुर आणि शक्तिशाली गीतांसह, आपल्या महान संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र या. भारताच्या हृदयाला श्रद्धांजली!
Dharamshala, get ready to sing with pride! 🇮🇳🔥
B Praak brings the nation’s sound on a night of patriotism and notes echoing India’s spirit. With soulful melodies & powerful anthems, unite to celebrate our great culture.
A tribute to the heart of Bharat!#TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/KTa4ZkaWq5
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2025
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि आमनेसामने अक्षर पटेल आमनेसामने असणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना प्लेऑफच्या उद्देशाने दिल्ली संघाच्या आशा जिवंत ठेवेल तर पंजाब किंग्सच्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एक विजयाची गरज आहे.
BCCI करणार आज सामन्याआधी खास कार्यक्रमाचे आयोजन! भारतीय सशस्त्र दलांना अर्पण करणार श्रद्धांजली
गुणतालिकेबद्दल बोलायचं झाल तर पंजाब किंग्सचा संघ पॅांइट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. संघाचे सध्या 15 गुण आहेत.पंजाबच्या संघाने 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 7 सामन्यात विजय मिळवला आहे तर 4 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे. संघाचे सध्या 13 गुण आहेत, यामध्ये त्यांनी 11 सामने आतापर्यत खेळले आहेत. यामध्ये 6 सामन्यात दिल्लीच्या संघाला विजय मिळाला आहे, तर 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.