फोटो सौजन्य – X
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स लीग सुरू झाले आहे. यामध्ये पहिले दोन सामने चांगल्या प्रकारे पार पडले. पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला पराभूत केले होते तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा वेस्टइंडीज विरुद्ध सामना अनिर्णित राहिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २० जुलै रोजी सामना खेळवला जाणार होता. एडबस्टन येथे खेळण्यात आलेला सामना हा रद्द करावा लागला. भारताच्या काही खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स यांनी हा सामना अधिकृतपणे रद्द करून सोशल मीडिया संदर्भात घोषणा केली होती.
आता पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय खेळाडूंच्या या निर्णयावर खिल्ली उडवली आहे. सध्या त्याचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आफ्रिदीने आपला राग तीव्रपणे व्यक्त केला आहे आणि अप्रत्यक्षपणे शिखर धवनवर निशाणा साधला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की धवन हा भारतीय संघातील पहिला खेळाडू होता ज्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रिदी म्हणाला, “खेळ देशांना जवळ आणतो. जर राजकारण प्रत्येक गोष्टीत आडवे आले तर तुम्ही पुढे कसे जाल? संवादाशिवाय गोष्टी सोडवता येत नाहीत. अशा कार्यक्रमांचा उद्देश एकमेकांना भेटणे हा देखील असतो. तथापि, तुम्हाला माहिती आहे की नेहमीच एक कुजलेला अंडा असतो जो सर्वकाही बिघडवतो. भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवस आधी सराव केला होता. मला वाटते की टीम इंडियाने फक्त एका खेळाडूमुळे आपले नाव मागे घेतले. भारतीय संघ देखील खूप निराश आहे. ते येथे खेळण्यासाठी आले होते.”
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भारताला अनेक खरे खोटे सुनावले होते त्याचबरोबर पाकिस्तान निर्दोष आहे असे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. हा वाद मोठ्या प्रमाणात चालला त्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटर्स देखील भारताच्या समर्थनात सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 25 हून अधिक पर्यटकांना त्यांचे जीव गमवावा लागला होता. पाकिस्तानमधील काही आतंकवादी येऊन त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडून ठार मारले.
Shahid Afridi reacted to the cancellation of the clash between India Champions and Pakistan Champions, with his presence being one of the main reasons behind several Indian players refusing to play.#WCL2025 #WCL25 pic.twitter.com/F5P107b7do
— Circle of Cricket (@circleofcricket) July 21, 2025
भारताने त्याच्या प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूर कडक शब्दात उत्तर दिले. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधील अनेक आतंकवादी अड्डे हे उडवण्यात आले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन ते तीन आठवडे तणावाचे वातावरण राहिले. एवढेच नव्हे तर भारतामध्ये अनेक पाकिस्तानी कलाकारांना देखील बॅन करण्यात आले.