फोटो सौजन्य - PTI Photo सोशल मीडिया
रणजी ट्रॉफीचे सामने सध्या सुरु आहेत, तर दुसरीकडे भारताचा संघ इंग्लडविरुद्ध तीन सामान्यांची मालिका खेळत आहे. यामध्ये टीम इंडियामधून अनेक खेळाडूंना चांगली कामगिरी रणजी ट्रॉफीमध्ये करूनही वगळले जात आहे. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा वरिष्ठ कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणेने मुंबईसाठी दुसऱ्या डावात शतक झळकावले. रहाणे जवळजवळ दोन वर्षांपासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहे, त्याने शेवटचा कसोटी सामना जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळला होता. तेव्हापासून रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, परंतु आता त्याचे कसोटी संघात पुनरागमन खूप कठीण झाले आहे असे दिसते.
जवळजवळ दोन वर्षांनंतर, रहाणेची वेदना बाहेर आली आहे, त्याने कसोटी संघातून वगळल्याबद्दल उघडपणे बोलला आहे. उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाविरुद्ध सामना जिंकून देणारे शतक झळकावल्यानंतर रहाणे म्हणाला की त्याच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. ३६ वर्षीय रहाणेला जेव्हा टीम इंडियामध्ये परतण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने थेट सांगितले की, निवडकर्त्यांचे काम निवडकर्त्यांवर सोपवणे चांगले.
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत रहाणे म्हणाला, ‘निवड संबंधित बाबी निवडकर्त्यांवर सोपवा.’ मी सध्या भविष्याबद्दल अजिबात विचार करत नाहीये. पण हो मला माहिती आहे की मी चांगली फलंदाजी करत आहे. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. यंदाचा रणजी ट्रॉफी हंगामही चांगला चालला आहे. मी २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही चांगली फलंदाजी केली. त्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. संघात निवड होणे किंवा न होणे ही वेगळी बाब आहे, ते निवडकर्त्यांचे काम आहे, पण हो मला वाटते की मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चांगली फलंदाजी केली.
Ajinkya Rahane said, “I batted nicely in the WTC Final in 2023. After that, I got dropped. Being selected or not selected is another matter, and the job of the selectors. But I thought I played well in that WTC Final”. pic.twitter.com/u3O5yPAvkC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 12, 2025
भारताने सलग दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळले आहेत, २०२१ मध्ये न्यूझीलंडने त्यांना जेतेपदाच्या सामन्यात हरवले आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने जेतेपद जिंकले. २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये, रहाणेने पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ४६ धावा केल्या. रहाणे पहिल्या डावात भारताचा सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू होता, तर दुसऱ्या डावात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू होता. यानंतर, रहाणे वेस्ट इंडिज दौऱ्यावर अपयशी ठरला आणि त्याला संघातून वगळण्यात आले होते त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी दिली नाही. आता त्याने केलेल्या रणजी ट्रॉफीच्या कामगिरीनंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल.