वर्ल्ड कप २०२३ : भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. या संघाचे कर्णधार कपिल देव होते. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने २०११ चा विश्वचषक जिंकला. अशा प्रकारे टीम इंडियाने दोनदा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे . मात्र, भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याकडे डोळे लावून बसला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त संघाचे गोलंदाजही जबाबदार असतील. पण तुम्हाला माहित आहे का विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-५ गोलंदाज कोण आहेत?
भारतासाठी विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीर खान पहिल्या क्रमांकावर आहे. झहीर खानने २३ वर्ल्डकप मॅचमध्ये ४४ विकेट घेतल्या. त्याचबरोबर या यादीत जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानावर आहे. जवागल श्रीनाथने ३४ सामन्यात ४४ खेळाडूंना बाद केले. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. मोहम्मद शमीने भारताकडून ११ विश्वचषक सामन्यात ३१ विकेट घेतल्या आहेत.
अशाप्रकारे भारतासाठी विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-३ गोलंदाजांच्या यादीत झहीर खान, जवागल श्रीनाथ आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे या यादीत आहे. अनिल कुंबळेने १८ विश्वचषक सामन्यांमध्ये विरोधी पक्षाच्या ३१ फलंदाजांना बाद केले. यानंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा क्रमांक लागतो. कपिल देव यांनी २६ सामन्यात २८ विकेट घेतल्या.