फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Anjum Chopra’s statement on Rohit Sharma’s performance : सध्या आयपीएल २०२५ चा हंगाम सुरु आहे. आतापर्यत या सीझनचे ३० सामने झाले आहेत. यामध्ये आतापर्यत दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकणारे संघ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघानी या सीझनमध्ये खराब कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे.
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा मानते की रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे मुंबई इंडियन्स संघ आयपीएलच्या चालू हंगामात आपली लय मिळवू शकलेला नाही. मुंबईचा माजी कर्णधार रोहित आता या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघात एक प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळत आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये ०, ८, १३, १७ आणि १८ धावा केल्या आहेत. रविवारी मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला आणि संघ चार पराभव आणि दोन विजयांसह सातव्या स्थानावर आहे.
यावे आता प्रेसेंटेटर आणि कॉमेंटेटर अंजुम चोप्रा यांनी रोहित शर्माच्या कमगिरीवर वक्तव्य केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “तुम्ही कदाचित फॉर्ममध्ये नसाल,” अंजुमने पीटीआय व्हिडिओला सांगितले. हा गुन्हा नाही, पण याचा संघाला काही फायदा होत नाही. यामुळे मुंबईला हवी तशी सुरुवात करता आली नाही.
PBKS vs KKR : आज कोलकाता करणार पंजाबसोबत दोन हात, अय्यरसेना सज्ज तर अजिंक्य सेनेनेही भरला हुंकार..
पुढे त्या म्हणाल्या की, ‘त्यांच्याकडे पर्याय आहेत.’ रोहितला फलंदाजीच्या क्रमाने खाली पाठवता येईल. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही असे नाही, कधीकधी तुम्हाला स्पर्धेत चांगली सुरुवात मिळत नाही ज्याचा परिणाम फलंदाज म्हणून किंवा खेळाडू म्हणून तुमच्यावर होतो. ‘खेळात असे घडते.’ आम्ही स्पर्धा पाहत आहोत, मग ते आयपीएल असो किंवा विश्वचषक. पण मला सांगा तुम्ही, प्रत्येक संघाला वाटते की तुमचा सर्वोत्तम फलंदाज वर्ल्ड कपमध्ये फॉर्ममध्ये असावा असे तुम्हाला वाटत नाही का? अशा कामगिरीसाठी खूप ऊर्जा लागते.”
अंजुम चोप्रा यांनी सांगितले की, ‘बरेच लोक त्यातून बरे होतात आणि पुढील स्पर्धेशी जुळवून घेतात.’ आयपीएलमध्ये त्याला अशी सुरुवात करता आली नाही. पण तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे आणि तो सामने कसे जिंकू शकतो हे आपल्याला माहिती आहे.