एलिसा हिली(फोटो-सोशल मीडिया)
Australia captain Alyssa Healy : आयसीसीकडून ताजी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये टॉप १० खेळाडूंच्या स्थानांमध्ये चांगलाच उलटफेर झाला आहे. २०२५ च्या महिला विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या या रँकिंग अपडेटमध्ये, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने सर्वात मोठी झेप घेतली आहे. तिला नऊ स्थानांचा फायदा होऊन तिने केवळ टॉप १० मध्येच प्रवेश केला नाही तर थेट चौथे स्थान देखील मिळवले आहे.
हिलीने अलीकडेच विश्वचषकाच्या १३ व्या सामन्यातमध्ये भारताविरुद्ध सामना जिंकून देणारी धमाकेदार खेळी केली होती. तिने १०७ चेंडूत १४२ धावा केल्या होत्या. या खेळीत तिने २१ चौकार आणि तीन षटकार लगावले होते. कामगिरीचा तिला आयसीसी रँकिंगमध्ये थेट फायदा पोहचला आणि तिचे रेटिंग आता ७०० वर जाऊन पोहोचले आहे. फक्त भारताची स्मृती मानधना (७९३), इंग्लंडची नॅट सायव्हर-ब्रंट (७४६) आणि ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी (७१८) आता तिच्यावर आहेत.
हेही वाचा : IND VS PAK : हस्तांदोलनाचा वाद ताजाच अन् घडले असे काही; भारत-पाक खेळाडूंनी एकमेकांना दिले हाय-फाइव्ह…
भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाने तिचे अव्वल स्थान कायम राखले आहे. तर दुसऱ्या स्थानी नॅट सायव्हर-ब्रंट आणि बेथ मूनी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्डला देखील तीन स्थानांचा फायदा होऊन संयुक्तपणे चौथ्या स्थानावर पोहोचली. न्यूझीलंडची सोफी डेव्हाईन दोन स्थानांनी झेप घेऊन सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.
एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत काही खेळाडूंना फटका देखील बसला आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी एक स्थान घसरून सातव्या स्थानावर, तर अॅशले गार्डनर तीन स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थानावर आली आहे. टॉप १० मध्ये पाकिस्तानची सिद्रा अमीन एक स्थान झेप घेऊन नवव्या स्थानावर जाऊन पोहोचली. सर्वात मोठा धक्का दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्सला बसला असून जी सहा स्थानांनी घसरून दहाव्या स्थानावर पोहचली आहे.
या ताज्या रँकिंगवरून असे दिसून आले आहे की २०२५ च्या महिला विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंच्या स्थानात चढ-उतार होऊ शकतात. एलिसा हिलीसारख्या तरुण खेळाडूंचा उदय आणि ताजमिन ब्रिट्ससारख्या अनुभवी खेळाडूंची घसरण ही गोष्ट दाखवून देतात की, प्रत्येक सामना आणि डावांचा रँकिंगवर थेट परिणाम होत असतो.






