नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. बॅड पॅच हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असतोच, याला कितीही महान खेळाडू असला तरी अपवाद नाही, याचाच सामना सध्या भारताचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहलीला करावा लागत आहे. मागील तीन वर्षापासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket century) शतकी पारी साकारता आलेली नाही. त्यामुळं विराटवर प्रचंड टिका होत आहे. तसेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणी होत आहे. एकेकाळचा रनमशिन असलेल्या विराटच्या (Virat Kohli) बॅटमधून सध्या धावाच निघत नाहीत. अनेक दिग्गज आणि चाहते त्याला साथ देत आहेत. विराटचे चाहते सुद्धा विराटच्या पाठीशी आहेत. अशातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विराट कोहलीच्या पाठिशी उभा राहिला आहे. बाबर आझमनं विराटच्या समर्थनार्थ ट्विट (Tweet) केले आहे.
[read_also content=”शरद पवारांबद्दल कधीही अपशब्द वापरला नाही, वेळ पडल्यास घरी जाऊन त्यांची माफी मागेन – दीपक केसरकर https://www.navarashtra.com/maharashtra/never-used-bad-words-about-sharad-pawar-if-time-comes-i-will-go-home-and-apologize-to-him-deepak-kesarkar-304477.html”]
बुधवारी टीम इंडियाचा इंग्लंडकडून (India and Englaand) लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर पराभव झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १४६ धावांवरच बाद झाला. या मोठ्या पराभवानंतर पुन्हा एकदा विराटच्या फलंदाजीबाबत चर्चा होत आहे. तसेच त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
पण सामन्यानंतर बाबर आझमने ट्विट करत विराटला पाठिंबा दिला आहे. बाबर आझमनं आपल्या ट्विटमध्ये विराटबरोबरचा स्वत:चा एक फोटो शेअर करत ‘ही (वाईट) वेळही निघून जाईल’, अशा प्रकारचे ट्विट केले आहे. (Babar Azam’s special tweet for Virat Kohli, netizens gave Babar Azam this reaction) त्यामुळं सगळ्याचाच भुवया उंचावल्या आहेत.