फोटो सौजन्य - BCCI
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ : भारतीय क्रिकेट संघाचे सचिव जय शाह यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आता आयसीसी प्रमुख झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा सचिव कोण होणार यावर बऱ्याच दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता सोशल मीडियावर बीसीसीआयने त्याच्या अकाऊंवर बीसीसीआयचे सचिव आणि कोषाध्यक्ष यांची निवड केल्याची घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे सचिव म्हणून निवड करण्यात आली ते जय शहा यांची जागा घेणार आहेत. तर कोषाध्यक्षपदी प्रभातेजसिंग भाटिया यांची निवड झाली आहे. जय शहा आणि आशिष शेलार यांच्या रिक्त झालेल्या पदांसाठी सैकिया आणि प्रभातेज हे एकमेव उमेदवार रिंगणात होते आणि दोघेही बिनविरोध निवडून आले होते.
Kho Kho World Cup : आजपासून होणार खो खो विश्वचषकाचा शुभारंभ, भारताला आव्हान देण्याच्या तयारीत संघ
जय शाह १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून सैकिया बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम करत आहेत. शाह यांच्या राजीनाम्यानंतर, देवजीत सैकिया यांना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अंतरिम सचिव म्हणून नियुक्त केले होते, तर खजिनदाराच्या भूमिकेसाठी कोणतीही अंतरिम नियुक्ती करण्यात आली नव्हती. बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणतेही रिक्त पद ४५ दिवसांच्या आत SGM बोलावून भरले पाहिजे. रविवारी या कालावधीचा ४३ वा दिवस होता.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Mr. Devajit Saikia & Mr. Prabhtej Singh Bhatia elected as Honorary Secretary and Honorary Treasurer of BCCI.
All The Details 🔽 @lonsaikia | @prabhtejb https://t.co/1GQA3xJgoM pic.twitter.com/cgPeCy6Ph5
— BCCI (@BCCI) January 13, 2025
यापूर्वी आशिष शेलार हे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष होते मात्र त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पद सोडले. त्यानंतरच भाटिया यांनी कोषाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. शाह यांनी गेल्या महिन्यात ग्रेग बार्कले यांच्या जागी आयसीसी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. निकाल जाहीर करताना निवडणूक अधिकारी एके जोठी म्हणाले, “सचिव आणि खजिनदार या दोन पदांसाठी निवडणूक बिनविरोध झाली आणि त्यामुळे मतदानाची गरज भासली नाही.” एसजीएममध्येही त्यांचे स्वागत करण्यात आले