IND vs ENG 3rd ODI (Photo Credit- X)
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. टी-२० मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ झाला होता. मात्र, वन-डे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे क्लीन स्वीपचे सावट पूर्णपणे टळले आहे. आता १९ जुलै रोजी (रविवार) होणारा हा सामना टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा असेल. या अंतिम सामन्यासह भारतीय संघाचा हा इंग्लंड दौरा देखील संपणार आहे. त्यामुळे मालिका विजयाने दौऱ्याचा समारोप करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.
‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल
वेळेचा विचार केला तर, हा तिसरा सामना भारतीय वेळेनुसार (IST) दुपारी साडेतीन वाजता (३:३० PM) सुरू होईल, तर सामन्याचा टॉस (फेक) अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी ३:०० वाजता होईल. या मालिकेतील पहिला सामना याच वेळेत झाला होता, तर दुसरा सामना संध्याकाळी साडेपाच वाजता खेळवला गेला होता. रविवारचा हा निर्णायक सामना साडेतीन वाजता सुरू होऊन रात्री साधारण साडेदहा वाजेपर्यंत चालेल.
या अंतिम सामन्यात संपूर्ण जगाचे लक्ष भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असणार आहे. एकीकडे रोहित शर्माच्या वन-डे करिअरचा हा शेवटचा सामना असू शकतो आणि तो निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशा चर्चा क्रीडा वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल; परंतु या सामन्यात रोहित आणि विराट मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचला जाईल. रोहित आणि विराट एकत्र खेळत असलेला हा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे, जो क्रिकेट जगतातील एक अभूतपूर्व विक्रम आहे. अशा ऐतिहासिक सामन्यात हे दोन्ही दिग्गज कशी फलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs ENG: टीम इंडियाच्या अडचणीत भर; लॉर्ड्स वनडेपूर्वी विजयाचा हिरो मालिकेबाहेर






