Vinod Kambli : आता बीसीसीआयमध्ये रंगणार 'पेन्शन युध्द'; इरफान पठाणला मिळते विनोद कांबळीपेक्षा दुप्पट रक्कम.. (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Vinod Kambli : भारताच्या अनेक माजी खेळाडूंना बीसीसीआय पेन्शन देत असते. तसेच बीसीसीआयच्या या पेन्शनमधून अनेक माजी खेळाडूंचा खर्चही भागवण्यात येत स्टो. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवरच आपल्या आयुष्याचा गाडा चालवत असतो. विनोद कांबळीला बीसीसीआयकडून मासिक 30 हजार रुपये पेन्शन दिले जाते.
विनोद कांबळी गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींमध्ये सापडला आहे. याबाबत अनेक रिपोर्ट बाहेर आले आहेत. त्याची उधळपट्टी जीवनशैली आणि कथित दारूच्या व्यसनामुळे त्याला 13 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येतअ आहे. त्यानंतर त्याला आता केवळ फक्त बीसीसीआयच्या पेन्शनचा आधार आहे. विनोद कांबळी आपल्या दैनंदिन खर्चासाठी आता पुर्णत: बीसीसीआयवर अवलंबून असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : ICC कडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकने जाहीर; ‘या’ धमाकेदार भारतीय खेळाडूचा समावेश..
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही बालपणीचे मित्र आहेत. यांची मैत्री प्रसिद्ध आहे. सचिनसोबत कांबळीची तुलना जात असते. कांबळीला बीसीसीआयकडून पेन्शन म्हणून 30 हजार रुपये दरमहा मिळतात, तर महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरला 70 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. बीसीसीआयने निवृत्त खेळाडूंसाठी संरचित पेन्शन योजना सुरू केली आहे, जी भारतासाठी किमान पाच कसोटी सामने खेळलेल्यांना आर्थिक सहाय्य पुरवत असते.
BCCI ची पेन्शन योजनेमुळे माजी खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, क्रिकेट संघातील त्यांचे योगदान लक्षात ठेवले जाते.
माहितीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन हे दोन्ही शतकवीर विजयाचे शिल्पकार ठरले. दुबईत 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासोबत भिडणार आहे.