(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IPL मधील एका धडाकेबाज खेळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या वैभव सूर्यवंशीने, १९ वर्षांखालील आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. त्यामुळे यानंतर आता त्याला ‘टीम इंडिया’मध्ये स्थान देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वैभव व्यतिरिक्त, आयुष म्हात्रे आणि समीर रिझवी यांसारख्या इतर खेळाडूंना घडवण्यासाठीही BCCI ने एक विशेष योजना आखली आहे. या उपक्रमाचे नेतृत्व BCCI चे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ करत आहे.
PTI च्या एका अहवालानुसार, BCCI जून-जुलै महिन्यात एक चार दिवसीय स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारी केली आहे. ज्यामध्ये ६४ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असेल आणि सामने विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळले जाणार आहेत. खेळाडूंचे तंत्र, उपजत कौशल्य आणि temperament तपासणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून, पुढील एका दशकासाठी कसोटी संघाकरिता एक भक्कम talent pool निर्माण करण्याचे BCCI चे ध्येय आहे. सहभागी खेळाडूंपैकी २५ खेळाडूंची निवड रणजी आणि देशांतर्गत क्रिकेटमधून केली जाईल, तर अन्य २५ खेळाडूंची निवड कनिष्ठ गटातील क्रिकेटमधून विशेषतः सी.के. नायडू ट्रॉफी आणि कूचबिहार ट्रॉफीमधून केली जाणार आहे. उर्वरित खेळाडूंची निवड IPL मधून केली जाईल.
या प्रक्रियेत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ते यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल; यावरूनच ‘टीम इंडिया’च्या भविष्यासाठी हा उपक्रम किती महत्त्वपूर्ण आहे, हे अधोरेखित होते. अहवालांनुसार, भविष्यातील विविध मोहिमांसाठी संघाची निवड करतानाही या स्पर्धेतील कामगिरीचा आधार घेतला जाईल. सध्या IPL ची १९ वा सीझन सुरू आहे; ही स्पर्धा संपल्यानंतर, भारतीय १९ वर्षांखालील आणि Emerging संघ चार दिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय संघाने एकदिवसीय (ODIs) आणि टी-२० (T20s) सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती; मात्र, ‘रेड-बॉल क्रिकेट’मध्ये (कसोटी क्रिकेटमध्ये) संघाला तितकेसे यश मिळवता आले नाही. मागील १२ वर्षे मायदेशात अजिंक्य राहिलेल्या टीम इंडियाला, न्यूझीलंड आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका—या दोन्ही संघांविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.






