फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
India vs New Zealand Champion Trophy 2025 Final Match :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील सामना काही वेळेमध्ये सुरु होणार आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाच्या खेळाडूंवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम खेळवला जाणार आहे. हा आयसीसी मोठा आणि दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. जो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना आहे. भारताच्या संघाने शेवटची चॅम्पियन ट्रॉफी २०१३ मध्ये नावावर केली होती आणि न्यूझीलंडच्या संघाने २००० मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. यानंतर दोन्ही संघ रिकाम्या हाताने खेळत आहेत.
भारताचा संघ या सामन्यांमध्ये विजय मिळवून १२ वर्षाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील तर न्यूझीलंडचा संघ मागील २५ वर्षांपासून या ट्रॉफीची वाट पाहत आहे. आजचा सामना नक्कीच मनोरंजक असणार आहे. अशा परिस्थितीत, या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
सर्वप्रथम, जर आपण टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोललो तर त्यात फारसा बदल दिसून येत नाही. तथापि, न्यूझीलंड संघात डावखुऱ्या फलंदाजांची उपस्थिती लक्षात घेता, संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा मोह करेल. पण तो संघाला हवी तशी कामगिरी करेल का? हा एक प्रश्न आहे. जर व्यवस्थापनाने चौकटीबाहेर विचार केला आणि जडेजा किंवा कुलदीपच्या जागी वॉशिंग्टनला संधी दिली तर हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
The experts weigh in their thoughts & wishes for #RohitSharma led #TeamIndia ahead of the Finals vs NZ.
Are you feeling the #ChampionsAgain feel too? #ChampionsTrophyOnJioStar FINAL 👉 #INDvNZ | TODAY, 1:30 PM on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2 & Sports18-1!… pic.twitter.com/ZGRyatvdQR
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनाही उपांत्य फेरीतील संघाप्रमाणेच संघात उतरायचे आहे. या परिस्थितीत डेव्हॉन कॉनवेला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल. जर मॅट हेन्री पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी नॅथन स्मिथला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. ही टीम देखील पूर्णपणे सेट दिसते. त्यांच्याकडे चार फिरकी गोलंदाज आहेत.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि मॅट हेन्री/नाथन स्मिथ.