२८ ऑगस्ट रोजी आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला असून पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा संघातून बाहेर गेला आहे. आफ्रिदी झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या आशिया कपला मुकला आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला असून पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shahin Afridi) हा संघातून बाहेर गेला आहे. आफ्रिदी झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या आशिया कपला मुकला आहे.
गेल्या टी २० विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली होती. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली सारखे भारताचे अव्वल फलंदाज माघारी धाडून भारताला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र यंदा तो दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार असल्यामुळे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेविरूद्धच्या गाले कसोटीत शाहीन आफ्रिदीचा उजव्या गुडघ्यामधील लिगामेंट दुखावला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची वैद्यकीय सल्लागार समिती आणि एक्पर्ट डॉक्टरांनी त्याला ४ ते ६ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शाहीन आफ्रीदी दोन मोठ्या स्पर्धांना मुकणार आहे. पीसीबी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्ला सूमरो यांनी सांगितले की, “मी शाहीनशी बोललो आहे. तो आशिया कपला मुकणार म्हटल्यावर खूप नाराज झाला आहे. ते स्वाभाविक आहे. मात्र आफ्रिदी एक धाडसी युवा खेळाडू आहे. तो या दुखापतीवर यशस्वीरित्या मात करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सज्ज होईल”.
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ :
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.