फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : मागील काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने अनेक संघाला मागे टाकले आहे. T२० विश्वचषकामध्ये त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषकामध्ये त्यांनी अनेक बलाढ्य संघाला मागे टाकत त्यांच्या खेळामध्ये सुधारणा केल्या आहेत. सध्या भारतानंतर अफगाणिस्तानचा संघ टॉप मध्ये आहे. काल अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला यामध्ये इंग्लंडला हरवल्यानंतर अफगाणिस्तान संघाचे मनोबल वाढले आहे. अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या विजयानंतर आता ग्रुप बी च्या गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.
अफगाणिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे, संघाचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्टीव्ह स्मिथ नेतृत्वात कमालीची कामगिरी केली आहे. तथापि, अफगाण संघासाठी पुढचा रस्ता अजूनही सोपा नाही, परंतु इंग्लंडच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानला अजिबात हलके घेऊ इच्छित नाही. दुसरीकडे, संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याबाबत आपले इरादे व्यक्त केले आहेत.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐁𝐄𝐀𝐓 𝐄𝐍𝐆𝐋𝐀𝐍𝐃! 🙌
Afghanistan has successfully defended their total and defeated England by 8 runs to register their first-ever victory in the ICC Champions Trophy. 🤩
This marks Afghanistan’s second consecutive victory over England in ICC… pic.twitter.com/wHfxnuZiPc
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. आता अफगाण संघाचा पुढचा महत्त्वाचा सामना ऑस्ट्रेलियाशी असेल, हा सामना अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत खेळेल की नाही हे ठरवेल.
या सामन्यापूर्वी, अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, मी अफगाणिस्तानचा प्रशिक्षक झाल्यापासून आम्ही ऑस्ट्रेलियासोबत तीन वेळा खेळलो आहोत. आम्ही सर्व सामन्यांमध्ये शानदार खेळलो आहोत. आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आता कोणीही अफगाणिस्तानला हलके घेऊ इच्छित नाही. आम्ही पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहोत, आम्हाला सामना जिंकण्याची आशा आहे. मला खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत.
Afghanistan coach Jonathan Trott is eyeing off a spot in the #ChampionsTrophy 2025 semi-finals 💥https://t.co/aFUx2YosIY
— ICC (@ICC) February 27, 2025
अफगाणिस्तान संघाचा पुढील सामना २८ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना जिंकून अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवू इच्छितो. जर ऑस्ट्रेलियन संघ हा सामना गमावला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल. सध्या, अफगाणिस्तान संघ २ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.