सौजन्य - ICC 'बेन डकेट'ने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची केली धुलाई; 165 धावांची खेळी करीत रचला इतिहास; कांगारूंसमोर 352 धावांचे विशाल लक्ष्य
Champions Trophy 2025 AUS vs ENG Match : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लडचा सलामीवर बेन डकेट आज ऑस्ट्रेलियाला आस्मान दाखवले. फिल सॉल्टची विकेट लवकर गेल्यानंतर त्याने एकहाती किल्ला लढवला. त्याला जो रूटने चांगली साथ दिली. बेन डकेटने 143 चेंडूत 165 धावांची मोठी खेळी केली. तर जो रुटने 78 चेंडूत 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज प्रभाव दाखवू शकला नाही. शेवटच्या फळीत जोफ्रा आर्चरने जोरदार फटकेबाजी करीत 10 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.
बेन डकेटने रचला इतिहास
Curriculum vitae 📝
Name: Ben Duckett
Occupation: England Cricketer
Enjoys: Smashing runs vs Australia pic.twitter.com/fpaiqWFGQp— England Cricket (@englandcricket) February 22, 2025
इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. इंग्लंडने ६ षटकांत २ गडी गमावले असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेन डकेटने शानदार शतक झळकावले. डकेटने केवळ शतकच केले नाही तर त्याच्या आक्रमक फलंदाजीने ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले. त्याने ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक आहे.
लाहोरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय सुरुवातीला योग्य वाटला. ऑस्ट्रेलियाने ४३ धावांच्या आत इंग्लंडचे २ बळी घेतले. फिल सॉल्ट १० धावा काढून बाद झाला आणि जेमी स्मिथ १५ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या सुरुवातीच्या यशाचा अभिमान वाटत होता पण बेन डकेटने जो रूटसह कांगारूंच्या आनंदावर विरजण घातले.
बेन डकेट आणि जो रूट यांनी फक्त २५.४ षटकांत १५८ धावा जोडून इंग्लिश संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. रूट ६८ धावा करून बाद झाला, पण बेन डकेटने शतक पूर्ण करण्यापूर्वी हार मानली नाही. रूट बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच षटकात त्याने सलग दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याने १०० धावांचा टप्पा गाठताना एक षटकार आणि ११ चौकार मारले.