Champions Trophy 2025 टीम इंडियाचे ठरले! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय
Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळू शकते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पाकिस्तानात न जाण्याचे कारण दिले आहे. BCCI ने सुरक्षेचे कारण सांगितले आहे.
बीसीसीआयने केले कारण स्पष्ट
🚨 TEAM INDIA 🇮🇳 WON'T BE TRAVELLING TO PAKISTAN 🇵🇰
– The BCCI has communicated with the PCB that due to security concerns, they won't travel to Pakistan for 2025 Champions Trophy. Their desire is to play all their games in Dubai.#ChampionsTrophy pic.twitter.com/4ghDY8KNv4
— Richard Kettleborough (@RichKettle07) November 8, 2024
पाकिस्तानला जाण्यावरून बीसीसीआयचे स्पष्ट मत
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. अलीकडेच बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे. यामध्ये BCCI ने सुरक्षेचे कारण सांगितले आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळू शकतो. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नुकतेच पाकिस्तानला गेले होते. यानंतर टीम इंडियाचीही बरीच चर्चा झाली. पण आता पाकिस्तानला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
PCB कडून BCCI ला समजवण्याचा केला प्रयत्न
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानने भारताला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाकिस्तानमध्ये सामने खेळल्यानंतर टीम इंडियाने भारतात परतावे, असा प्रस्तावही पीसीबीने दिला होता. या संदर्भात इतर सूचनाही दिल्या. मात्र, BCCI ने सुरक्षेचे कारण देत सर्व प्रस्ताव फेटाळले.
पाकिस्तानच्या आशा पल्लवीत
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये न गेल्याने पीसीबीला मोठा फटका बसणार आहे. यामुळे त्याचे आर्थिक नुकसानही होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये बरेच काम केले आहे. ते नव्याने तयार झाले आहेत. यासाठी ICC ने निधीही जारी केला होता.
टीम इंडिया दुबईत खेळू शकते सामने
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळू शकते. यापूर्वी श्रीलंकेबाबतही चर्चा झाली होती. पण, BCCI ने दुबईचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते.
आज पाकिस्तानी गोलंदाजांनी ॲडलेडच्या मैदानावर कांगारूंचा धुव्वा उडवला
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी आज ॲडलेडच्या मैदानावर कांगारूंचा धुव्वा उडवला. अवघ्या 163 धावांवर संपूर्ण संघाला गुंडाळण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यश आले. यामध्ये हरीस रौफ, शाहिन अफ्रिदी आणि नसीम शाहने भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उद्ध्वस्त केली.
ॲडलेडच्या मैदानावर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे मालिकेत आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या वनडेत सुरुवातीपासूनच बॅकफूटवर राहावे लागले. आज पाकिस्तान 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आणि प्रत्येक गोलंदाजाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला खिळखिळीत ठेवण्याचा निर्णय घेतला.