सौजन्य - willyoung12 पाकिस्तानच्या छाताडावर बसून विल यंगने ठोकले शतक, अत्यंत कठीण परिस्थितीत संघासाठी केल्या महत्त्वाच्या धावा
कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये होत आहे. पाकिस्तानची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी मानली जात असली तरी या सामन्यात तसे नाही. गोलंदाजांना सुरुवातीपासूनच मदत मिळत आहे. फिरकीपटूंचे चेंडू खूप वळत आहेत. यामुळे, किवी फलंदाज संघर्ष करत आहेत पण या सगळ्यामध्ये, संघाचा सलामीवीर फलंदाज विग यंगने शतक झळकावले आहे.
विल यंगचे शानदार शतक
Will Young delivers on the big stage and brings up the first century of the #ChampionsTrophy 2025 🫡#PAKvNZ 📝: https://t.co/E5MS83LjB8 pic.twitter.com/uZzNqcaLvt
— ICC (@ICC) February 19, 2025
विग यंगचे चौथे एकदिवसीय शतक
विल यंगने एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे चौथे शतक झळकावले आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यंगने आपला ४१ वा एकदिवसीय सामना खेळत पहिल्यांदाच न्यूझीलंडबाहेर शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यंगसाठी पाकिस्तान दौरा आतापर्यंत काही खास राहिला नाही. पुन्हा एकदा तो त्रिकोणी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये २० धावा करण्यात अपयशी ठरला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतके झळकावणारे न्यूझीलंडचे फलंदाज
१४५* – नॅथन अॅस्टल विरुद्ध अमेरिका, द ओव्हल, २००४
१०२* – ख्रिस केर्न्स विरुद्ध भारत, नैरोबी, २०००
१०० – केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एजबॅस्टन, २०१७
११२ – विल यंग विरुद्ध पाकिस्तान, कराची, २०२५
न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला क्रीजवर संघर्ष करावा लागला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला खूप संघर्ष करावा लागला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे फक्त १० धावा करून बाद झाला. त्याने १७ चेंडूंचा सामना केला. केन विल्यमसनला फक्त एक धाव करता आली. डॅरिल मिशेलने २४ चेंडूत १० धावा केल्या. पण यंगने ५६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो १०७ धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला. नसीम शाहने यंगची विकेट घेतली. ११३ चेंडूंच्या त्याच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि एक षटकार मारला.