Border Gavaskar Trophy will start from November 22
Border Gavaskar Trophy 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जल्लोष क्रिकेटच्या मैदानावर नक्कीच पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी भारतीय फॅन्सकरिता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने येत्या 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. ऑस्ट्रेलियन मीडिया आता ३ भाषांमधील कसोटी मालिकेचे कव्हरेजही करणार आहे. इंग्रजी व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रे हिंदी आणि पंजाबीमध्ये कसोटी मालिका कव्हर करीत आहेत. ही भारतीय मीडियाच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे.
कसोटी मालिकेला ॲशेसची लढाई
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ॲशेसची लढाई म्हणतात. पण, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जे काही सुरू आहे ते आता ‘युगांची लढाई’ बनले आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 5 कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियन मीडियाने हे नाव दिले आहे. आतापर्यंत असे म्हटले जात होते की भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची क्रेझ कोणत्याही परिस्थितीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीपेक्षा कमी नाही. पण, कदाचित पहिल्यांदाच हे नाव देण्यात आले आहे. युगानुयुगे ही लढाई साजरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रेही भारतीय रंगात रंगली आहेत.
ऑस्ट्रेलियन मीडिया कव्हरेज हिंदी आणि पंजाबी मध्येदेखील
न्यूज कॉर्पने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 कसोटी सामन्यांची मालिका साजरी करण्यासाठी 8 पृष्ठांची विशेष आवृत्ती आणण्याचा निर्णय घेतला. ही आवृत्ती इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी आणि पंजाबी भाषेतही १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली. 8 पानांच्या आवृत्तीत, भारतीय क्रिकेटच्या मोठ्या नावांव्यतिरिक्त, उगवत्या नवीन खेळाडूंबद्दलसुद्ध भरभरून लिहिले आहे. याद्वारे ऑस्ट्रेलियन मीडियाचा उद्देश तिथे उपस्थित भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेणे हा आहे.
कव्हरेज सिडनी येथील डेली टेलिग्राफनेसुद्धा असेच केले आहे. मेलबर्नमधील हेराल्ड सन, ब्रिस्बेनमधील कुरिअर मेलने ते प्रकाशित केले आहे आणि ॲडलेडमधील द अॅडव्हर्टायझरने सुद्धा हे काम केले आहे. यानंतर 17 नोव्हेंबर रोजी 16 पानांचा अंक लाँच गाईडदेखील प्रकाशित होणार आहे, ज्याचा मजकूर हिंदी आणि पंजाबीमध्येदेखील असेल. त्यात खेळाडूंबद्दल लिहिलेल्या अधिक तपशीलवार किस्से आणि कथा असतील.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर विराट कोहलीचा फोटो प्रसिद्ध केला आहे आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला युगांची लढाई असे वर्णन केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपेक्षा कमी नसल्याचे वर्तमानपत्राच्या या कव्हरेजवरून स्पष्ट होते.