चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात ब्लाईंड क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी दिली NOC; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
India Blind Cricket Team for the T20 World Cup : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाठवण्यास भारत सरकारने परवानगी दिलेली नाही. यावरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला पोहचला आहे. या सर्व घडामोडीमध्ये क्रीडा मंत्रालयाने भारतीय अंध क्रिकेट संघाला टी-२० विश्वचषकासाठी NOC दिली आहे.
भारतीय संघाला मिळाली NOC
Hypocrisy PRO MAX ⤵️
India's Ministry of Sports have allowed India's Blind Cricket Team to travel to Pakistan for T20 Blind World Cup.
The WC starts on November 23. India vs Pakistan will be played in Lahore on November 25.#PakistanCricket https://t.co/l2KrqvMZei pic.twitter.com/JBKrLblTHs
— M (@anngrypakiistan) November 9, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरून पाकिस्तानचा संघर्ष
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत सरकारने टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही आगामी स्पर्धेत टीम इंडियासोबत कोणताही सामना न खेळण्याची धमकी दिली आहे. या सगळ्यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय अंध क्रिकेट संघाला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे. या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये स्पर्धा होणार आहे.
क्रीडा मंत्रालयाकडून NOC, मात्र गृहमंत्रालयाकडून प्रतीक्षा
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने या विश्वचषकासाठी भारतीय अंध क्रिकेट संघाला परवानगी दिली आहे. ही स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. तथापि, क्रीडा मंत्रालयाकडून NOC असूनही, अद्यापि गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून अंतिम परवानगी न मिळाल्याने भारतीय संघाच्या रवानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
गेली अनेक दिवस करीत होता प्रतीक्षा
गेल्या अनेक दिवसांपासून हा संघ या दोन मंत्रालयांच्या परवानगीची वाट पाहत आहे, त्यानंतरच या टी-२० विश्वचषकात सहभागी होता येईल. अंध क्रिकेट असोसिएशनच्या सरचिटणीसांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, त्यांना परवानगी मिळेल की नाही याविषयी ते १५ दिवसांपासून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्याने सांगितले की, अंध संघाने 2014 पासून पाकिस्तानला भेट दिली नाही. सरचिटणीसांच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्येही टीम इंडियाला परवानगी मिळाली नव्हती, तर गेल्या वर्षी भारतात झालेल्या या स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ आला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत वाद
क्रीडा मंत्रालयाची ही NOC अशा वेळी आली आहे जेव्हा BCCI ने आयसीसीला कळवले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाठवण्याची परवानगी मिळालेली नाही. अशा स्थितीत सरकार दोन्ही क्रिकेट संघांबाबत वेगवेगळी भूमिका घेणार की एकच निश्चित धोरण अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, याआधी भारतीय टेनिस संघाला डेव्हिस कप स्पर्धेसाठी आणि त्याआधी ब्रिज स्पर्धेसाठीही पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.