डब्ल्युटीसीच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर (फोटो- ai gemini)
कधी होणार अंतिम सामना?
तारीख – 9 जून ते 13 जून 2027
विशेष महत्व – कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला ऐतिहासिक आणि विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम सामना खेळण्यासाठी सर्व 9 संघ प्रचंड संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप फायनलमध्ये कोणते दोन संघ खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. तर गतविजेता दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील शर्यतीत आहे. अंतिम फेरीची चुरस वाढली आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या कसोटी मालिकांचे महत्व वाढले आहे.
The countdown is on 👀 The venue and dates for the #WTC27 Final have been locked in 🏏https://t.co/Ee62S7i8uA — ICC (@ICC) July 23, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर झाली आहे. या स्पर्धेत भारतीय कसोटी संघाचा प्रवास अत्यंत चुरशीचा असणार आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील सर्व कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सध्याच्या कामगिरीनुसार, भारताचा पीसीटी 48.15 इतका आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागणार आहेत.
बातमी अपडेट होत आहे…






