फोटो सौजन्य - Delhi Capitals
DC vs RCB Toss Update : आज दिल्ली कॅपिटल्सच्या होमग्राउंडवर सामना सुरु झाला आहे. दिल्लीचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लढत आहे. सांगायचे झाले आज विराट कोहली त्याच्या होमग्राउंडवर खेळणार आहे त्यामुळे आज कोहलीला पाहण्यासाठी चाहते मैदानावर गर्दी करतील. मागील सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांना पराभूत केले होते त्यामुळे बंगळुरूच्या संघ आज बदला घेण्याच्या इराद्यात मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघामध्ये एक बदल झाला आहे. आजच्या सामान्यमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज फिल्ल सॉल्ट त्याला बरे नसल्यामुळे तो आजचा सामना खेळणार नाही त्यांच्या जागेवर आज जेकब बेथल याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये फाफ डुप्लेसीचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
🚨 Toss 🚨@RCBTweets won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Match 4️⃣6️⃣
Updates ▶️ https://t.co/9M3N5Ws7Hm#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/sBD42HkvUq
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
आजच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. सध्या आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये सातत्याने कमालीचा खेळ दाखवत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलने अर्धशतक झळकवले होते आज तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. फाफ डुप्लेसीचे संघामध्ये पुनरागमन आज त्याच्या खेळीवर नजर आले. आरसीबीच्या फलंदाजांचे सांगायचे झाले तर रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, रोमरिओ शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड हे फलंदाज धुव्वादार फलंदाजी करत आहेत त्याचबरोबर दमदार फॉर्ममध्ये आहेत, टीम डेव्हिड या सीझनमध्ये कमालीची फलंदाजी करत आहे, त्याचबरोबर आरसीबीसाठी तो फिनिशरची भूमिका साकारताना दिसत आहे.
MI vs LSG : वानखेडेवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज गाजले! लखनऊ सुपर जायंट्ससमोर 216 धावांचे लक्ष्य
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, जेकब बेथल, रोमरिओ शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे इम्पॅक्ट प्लेयर : देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग
फाफ डुप्लेसी, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मता चमिरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दिल्ली कॅपिटल्सचे इम्पॅक्ट प्लेयर : आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, जेक फ्रेझर मॅकगुर्क, माधव तिवारी, त्रिपुराणा विजय