डिस्ने हॉटस्टार करणार आता मायबोली मराठीतून समालोचन
Disney+ Hotstar in Marathi : क्रिकेट तथा अन्य खेळाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणारे चॅनल म्हणून हॉटस्टार चॅनल प्रसिद्ध आहे. यावर क्रिकेट, फुटबॉल, टेनिससारख्या आंतरराष्ट्रीय खेळांचे समालोचन होत असते. नुकत्याच झालेल्या कबड्डी लीग स्पर्धेचेसुद्धा समालोचन येथे झाले होते त्यानंतर खो खो विश्वकपचेसुद्धा लाईव्ह स्ट्रिमिंग येथे पाहायला मिळाले. परंतु, या चॅनेलवर मराठीतून समालोचन होत नव्हते अन्य दुसऱ्या भाषांमध्येसुद्धा समालोचन होत होते हाच मुद्दा मनसेने पकडत थेट हॉटस्टारचे कार्यालयात धडक देत ऑफीस फोडण्याची धमकी दिली त्यानंतर हॉटस्टार मुख्य कार्यालयाने आता मराठीतूनसुद्धा समालोचन होणार असल्याचे लेखी आश्वासन पत्र मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिले.
मनसे नेत्यांसह पदाधिकारी आक्रमक
मनसे नेते अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट डिस्ने हॉटस्टारच्या मुख्य कार्यालयाला धडक दिली. डिस्ने हॉटस्टार अनेक खेळांचे लाईव्ह प्रदर्शन करीत असते, यामध्ये मराठी सोडता अन्य भाषांमधून या खेळांचे समालोचन होत असते. केवळ मराठीतून या खेळांचे समालोचन होत नाही याचे नेमकं काय कारण हाच धागा पकडत मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे नेते अमेय खोपक, मनसे पदाधिकारी संतोष धुरी, केतन नाईक आदी पदाधिकाऱ्यांसह मुंबई हॉटस्टारच्या मुख्य कार्यालयाला धडक दिली. मराठीतून समालोचन झालेच पाहिजे अन्यथा कार्यालय नीट राहणार नाही असा धमकीवजा इशारच दिला. यावेळी हॉटस्टार ऑफीसमधून येथून पुढे मराठीतूनसुद्धा समालोचन होईल असे सांगितले गेले.