फोटो सौजन्य – X
ऋषभ पंत – केएल राहुल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिला कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. चौथ्या दिनी भारताच्या दोन खेळाडूंनी शतक ठोकले. ऋषभ पंत हा आशियातील एकाच सामन्यात दोन शतक ठोकणारा दुसरा विकेटकीपर ठरला आहे. तर पहिल्या डावामध्ये कमी राहिलेली कसर केल राहुलने आज पूर्ण केली आणि शतक झळकावले. भारताच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये देखील चांगली कामगिरी केली. यामध्ये विशेष कौतुक म्हणजेच रिषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
भारताच्या संघाने तिसरा डावांमध्ये 364 धावा केल्या. यासह तिसऱ्या डावाची फलंदाजी संपल्यानंतर भारताच्या संघाकडे 370 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने के एल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या जोरावर ही मोठी धावसंख्या उभारली आहे. पाचवा दिवस हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे याआधी दोन्ही भारताच्या शतक वीर फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.
पहिल्या डावामध्ये भारताचा स्टार आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने पहिल्या डावांमध्ये 134 धावांची खेळी खेळली होती यामध्ये त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. या डावामध्ये त्याने 118 धावांची खेळ खेळली यामध्ये त्याने तीन षटकार आणि 15 चौकार मारले त्याचबरोबर 84.29 च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी केली. या पहिल्या सामन्यात रिषभ पंतची फलंदाजी प्रभावशाली राहिली. पंतने त्याच्या करिअरचे हे आठवे शतक झळकावले आहे. या सामन्यांमध्ये त्याची फारच मनोरंजक खेळी पाहायला मिळाली. पुढील चार सामन्यांमध्ये त्याचे कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
He’s steely, He’s Bold 💥 When Rishabh Pant bats, the records are never on hold 😎 Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/UuNea6WmiS — BCCI (@BCCI) June 23, 2025
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने मागील गावामध्ये 42 धावांची खेळी खेळली होती. यावेळी त्याचे अर्धशतक हुकले होते पण या डावामध्ये त्याने शतक पूर्ण केले आहे आणि त्याची कसर देखील पूर्ण केली. तिसऱ्या डावामध्ये केएल राहुल याने 137 धावांची खेळी खेळले यामध्ये त्याने 18 चौकार मारले तर 55. 47 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
भारताच्या संघाने या पहिल्या सामन्यात पाच शतक झळकावले पहिल्या डावांमध्ये भारताने एकूण तीन शतक झळकावले होते. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत यांनी देखील शतकीय खेळी खेळली. तिसरा डावामध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांनी शतक झळकावले.






