फोटो सौजन्य – X
भारतीय पुरुष संघाचा इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यामधील या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जात आहे, तर भारतीय महिला संघ हा पाच सामन्याची टी-ट्वेंटी मालिका खेळत आहे. पुरुष संघाची सुरुवात ही पराभवाने झाली आहेत तर भारतीय महिला संघाची सुरुवात ही विजयाने झाली होती. त्याचबरोबर अंडर 19 भारताचा युवा संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघांमध्ये पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. एक दिवसीय मालिकेमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला आहे.
पाच सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत भारताच्या संघाने तीन सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली आहे. आता शेवटचा सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे भारतीय युवा संघाची नजर ही मालिकेच्या चौथ्या विजयाकडे असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा एक दिवसीय मालिकेमधील शेवटचा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
IND VS ENG : इंग्लंडचा पराभव जवळजवळ पक्का! टेस्ट क्रिकेटमध्ये आजपर्यंत कधीही घडले नाही…
अंडर 19 भारत आणि अंडर 19 इंग्लंड यांच्यामध्ये एक दिवसीय मालिकेचा पाचवा सामना हा 7 जुलै रोजी म्हणजेच सोमवारी खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंड मधील न्यू रोड वॉसर्स्टर येथे या दोन संघांमध्ये लढत होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणारा युवा एक दिवसीय मालिकेचा पाचवा सामना हा भारतीय वेळेनुसार 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर या सामन्याचे नाणेफेक हे दुपारी तीन वाजता होणार आहे. भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार नाही या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही वॉर्सेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
इसाक मोहम्मद, बेन डॉकिन्स, जेडेन डेन्ली, बेन मेयेस, जोसेफ मूर्स, राल्फी अल्बर्ट, रॉकी फ्लिंटॉफ, जेम्स मिंटो, अलेक्झांडर वेड, सेबॅस्टियन मॉर्गन, थॉमस रीव्ह (कर्णधार), अॅलेक्स ग्रीन, जॅक होम, ताजीम चौधरी अली.
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार) (विकेटकिपर), हरवंशसिंग (विकेटकिपर), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, प्रवीण मोहम्मद, प्रवीण राव, प्रवीण ॲड. राणा, अनमोलजीत सिंग.