फोटो सौजन्य – X (Sachin Tendulkar)
India vs England match update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे यामध्ये भारताच्या संघाने दुसऱ्या डावामध्ये डाव घोषित करून इंग्लंड समोर 608 धावांचं लक्ष्य उभे केले आहे. चौथा दिनाच्या समाप्तीनंतर सुरू असलेल्या सामन्यात 90 ओवर मध्ये इंग्लंडच्या संघाला 536 धावांची गरज आहे. चौथ्या दिनी इंग्लंडच्या संघाने तीन विकेट्स गमावल्या आहेत.
इंग्लंडच्या संघासमोर भारताच्या संघाने मोठे आव्हान उभे केले आहे. पण इंग्लंडच्या संघाने मागील सामन्यात देखील चांगली कामगिरी करून सामना जिंकला होता. आज त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या संघाला हा सामन्यात जिंकण्यासाठी त्यांना असा पराक्रम करावा लागणार आहे जो आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोणीही केलेला नाही. त्यामुळे इंग्लंडचा जवळजवळ पराभव पक्का आहे असं मानलं जात आहे.
चौथ्या दिवसाच्या अखेरीस, इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावून ७२ धावा केल्या होत्या. त्यांचा सर्वात दिग्गज कसोटी क्रिकेट खेळाडू जो रूट देखील चौथ्या दिवशी फक्त ६ धावा करून बाद झाला. तथापि, हॅरी ब्रुक अजूनही १५ धावांवर नाबाद आहे, तर गेल्या सामन्यात १८४ धावांची नाबाद खेळी करणारा जेमी स्मिथ अद्याप फलंदाजीला आलेला नाही.
आता पाचव्या दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ५३६ धावा करण्याचा मोठा पराक्रम करावा लागेल. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही संघाने पाचव्या दिनी 500 रन बनवलेले नाहीत. आत्तापर्यंत क्रिकेटचा इतिहासामध्ये सर्वात मोठी धावसंख्या ही ही ऑस्ट्रेलियाच्या संघाने केली होती असे कांगारूच्या संघाने 2001 मध्ये 459 धावा केल्या होता. त्यानंतर सर्वात मोठी धावसंख्या चेज करण्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ आहे वेस्ट इंडिजच्या संघाने 2003 मध्ये 418 धावांचे टारगेट पूर्ण केले होते.
Stumps on Day 4 in Edgbaston!
A magnificent day for #TeamIndia comes to an end 🙌
India need 7⃣ wickets on the final day to win the 2nd Test
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/tttip5pAbg
— BCCI (@BCCI) July 5, 2025
दुसऱ्या डावात आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने फक्त ७२ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान, गोलंदाजी करताना आकाश दीपने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.