Rohit Sharma Profile
विश्वचषक २०२३ : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने शानदार खेळी केली. भारतीय कर्णधार शतक झळकावण्यास हुकला असला तरी कठीण परिस्थितीत त्याने महत्त्वाची खेळी खेळली. रोहित शर्मा १०१ चेंडूत ८७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार मारले. आदिल रशीदने रोहित शर्माला बाद केले. वास्तविक, भारतीय फलंदाज एका विकेटवर बाद होत राहिले, पण रोहित शर्माने दुसरी विकेट शाबूत ठेवली.
विराट कोहली आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. परंतु श्रेयस अय्यर जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरला. रोहित-राहुलची शानदार फलंदाजी सुरु होती. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. केएल राहुलच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. केएल राहुल ३९ धावांवर बाद झाला. राहुल याला चांगली सुरुवात मिळाली होती, त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. अय्यरची हाराकिरी सुरुच असून भारताला तिसरा झटका बसला आहे.
लखनौच्या मैदानात इंग्लंडविरोधात टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, गिल आणि अय्यर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. केएल राहुल याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्माने ८७ धावांची खेळी केली. मैदानात सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जाडेजा खेळत होते. रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसला. जाडेजा १३ चेंडूत ८ धावांवर बाद झाला. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे १ धावेने अर्धशतक हुकले. मोहम्मद शमी एका धावेवर बाद झाला. भारताच्या संघाने २२९ धावांचे आव्हान इंग्लंड समोर दिले आहे.