टी २० विश्वचषक स्पर्धा अतिशय रंगतदार बनत चालली आहे. याच टी २० विश्वचषकातील एका सामन्यात महिला कमेंटेटरने हवेत लटकून केलेली कॉमेंट्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने हरल्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. या स्पर्धेतील तिसर्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा सहा गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान महिला समालोचक नताली जर्मनने अनोख्या पद्धतीने केलेल्या कॉमेंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महिला समालोचक नताली जर्मनने हिने सामन्यादरम्यान पर्थ स्टेडियमच्या छतावर जाऊन कॉमेंट्री केली. यादरम्यान त्याने दोरीच्या साहाय्याने उलटे लटकूनही कॉमेंट्री केली. त्याच्या या पराक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानचा संघ ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नताली दोरीच्या साहाय्याने उलटे लटकत कॉमेंट्री करत होती.