रोनाल्डो घेणार निवृत्ती (फोटो सौजन्य - Instagram)
मात्र या गोष्टीचे संकेत क्रिस्टियानो रोनाल्डोने आधीच संकेत दिले आहेत. या विश्वचषकानंतर रोनाल्डो निवृत्ती घेऊ शकतो. ४१ वर्षीय या खेळाडूची जगभरात प्रचंड क्रेझ आहे. विशेषतः तरूण मुलांमध्ये रोनाल्डो खूपच प्रसिद्ध आहे. या सामन्याबाबत रोनाल्डोने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
रोनाल्डोची पुष्टी
क्रिस्टियानो रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेत कबूल केले की, बहुप्रतिक्षित दिवस अखेर आला आहे. त्याने सांगितले की फिफा विश्वचषक २०२६ हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल. रोनाल्डो म्हणाला, “मला या सामन्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, कारण हा माझा शेवटचा विश्वचषक असणार आहे. पण मला आशा आहे की हा माझा शेवटचा सामना ठरणार नाही.” अनेकांना रोनाल्डोचा हा सामना रोमांचक व्हावा असंच वाटत आहे.
फुटबॉलवरील प्रेमाबद्दल एक विधान
क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणाला की, स्पेनविरुद्धच्या सामन्यात काहीही झाले तरी, तो पूर्णपणे समाधानी होऊनच निवृत्त होईल. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, उद्या काहीही झालं तरी, मी इथून पूर्ण समाधानानेच जाईन. १००% नाही, तर १०००% कारण मी फुटबॉलला सर्वस्व दिलं आहे. मला कशाचाही पश्चात्ताप होणार नाही. मी एक चांगलं आयुष्य जगतो. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड. मी फुटबॉल खेळतो कारण माझं त्यावर प्रेम आहे.”
देवाचे मानले आभार
पुढे पत्रकार परिषदेत, ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या शानदार कारकिर्दीवरही भाष्य केले. २००३ मध्ये पदार्पण केल्यानंतर, तो पोर्तुगालचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. त्याने २३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४६ गोल केले. रोनाल्डो देवाचे आभार मानत म्हणाला, “माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. मी विश्वचषक जिंकलो किंवा नाही, तरीही देव माझ्यावर खूप उदार आहे.”






