लिओनेल मेस्सी (फोटो- ians)
इंग्लंडचा संघ तब्बल 21 वर्षांनी पहिल्यांदाच अर्जेंटीनाविरुद्ध सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकूण 5 वेळेस आमनेसामने आले आहेत. 1962, 1966,1986 आणि 2002 मध्ये हे सामने झाले आहेत. जपानमध्ये झालेल्या मागील सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता.
FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत
इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू जो कोल यांनी एका पॉडकास्टमध्ये लिओनेल मेस्सीबाबत भाष्य केले आहे. लिओनेल मेस्सीला सेमीफायनलच्या सामन्यात रोखणे इंग्लंडसाठी कठीण नसेल. आम्हाला त्याला रोखावे लागेल आणि आम्ही त्यात यशस्वी होऊ. इंग्लंडचे खेळाडू सेमीफायनलमध्ये दबाब झेलू शकतील असा त्यांनी विश्वास वर्तवला आहे.
फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होणार आहे. एका बाजूला किलियन एम्बाप्पे आणि दुसऱ्या बाजूला लॅमिन यमाल असतील. हा सामना १५ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता सुरू होईल. स्पेन विरुद्ध फ्रान्स हा सामना अमेरिकेतील टेक्सास राज्यातील अर्लिंग्टन येथील एटी अँड टी स्टेडियमवर खेळला जाईल. स्पेन आणि फ्रान्स यांच्यात एकूण ३८ सामने खेळले गेले आहेत, ज्यात स्पेनने १८, तर फ्रान्सने केवळ १३ सामने जिंकले असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत. फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना २० जुलै रोजी मध्यरात्री १२:३० खेळला जाणार आहे. त्यापूर्वी, दोन्ही उपांत्य फेरीतील पराभूत संघ १९ जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील, जो भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.






