फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा कसोटी संघ : भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध २ मालिका खेळणार आहे. यामध्ये २ सामान्यांची कसोटी मालिका असणार आहे तर ३ T२० सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वखाली मैदानात उतरणार आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. १९ सप्टेंबरपासून भारताचा संघ कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकानंतर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करणार आहेत. भारतीय संघाची बांग्लादेशविरुद्ध होण्याऱ्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ युवा त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे.
भारताच्या संघामध्ये बांग्लादेशविरुद्ध सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असणार आहे. पुढील स्थानांसाठी केएल राहुल, सरफराज खान याना पहिल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताचे विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना संघामध्ये जागा मिळाली आहे.
हेदेखील वाचा – IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश मालिका रद्द होणार का? जाणून घ्या काय आहे कारण
टीम इंडियाच्या संघामध्ये मजबूत गोलंदाजीचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे संघामध्ये भरभरून अनुभव असलेल्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह यश दलाल या मजबूत गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दलाल