फोटो सौजन्य : Gujarat Titans
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स टाॅस अपडेट : आज आयपीएल 2025 चा 64 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. आजचा सामना गुजरातच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्याचा गुजरातच्या संघाने अविश्वसनीय कामगिरी केली होती. या सामन्यात गुजरातच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी नाबाद खेळी खेळली होती.
आजच्या सामन्यात गुजरातचा संघ पहिल्या स्थानासाठी टिकून राहण्यासाठी लढणार आहे. गुजरातच्या संघाने मागील सामन्यात 10 विकेट्सने सामना जिंकला होता आणि प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले होते. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आज ते त्याचा 13 वा सामना खेळणार आहेत.
🚨 Toss 🚨 @gujarat_titans won the toss and elected to field against @LucknowIPL #GT wearing a special jersey for a special cause tonight 🙌
Updates ▶️ https://t.co/NwAHcYJT2n #TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/byoukpW0wm
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी हा एक सामन्यासाठी बॅन करण्यात आला आहे. मागील लखनऊचा सामना हा हैदराबाद विरुद्ध झाला होता. या सामन्यात दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यामध्ये कडाक्याचा वाद झाला होता. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये मागील सामना पार पडला आणि या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिवेश राठी या दोघांचा कडाक्याचा वाद झाला होता यामध्ये दोघांना फाइन लावण्यात आले आहे. त्याचबरोबर दिग्वेश राठी याला एक सामन्याचा एक सामन्यात बॅन करण्यात आले आहे.
शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, शेरफेन रदरफोर्ड, राशिद खान, अर्शद खान, आर साई किशोर, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेअर – साई सुदर्शन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, वाॅशिंग्टन सुंदर, दशुन शनाका
ऋषभ पंत (कर्णधार), एडन मार्कराम, मिशेल मार्श, निकोलस पूरन, हिमंत सिंह, आयुष बडोनी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, आवेश खान, आकाश दीप, विलियम ओ’रोर्क
इम्पॅक्ट प्लेअर – आकाश सिंह, एम सिध्दार्थ, रवि बिश्नाई, डेविड मिलर, अर्शिन कुलकर्णी