फोटो सौजन्य : England Cricket
इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे : एक काळ असा होता जेव्हा झिबाब्वेचा संघ हा क्रिकेट विश्वामध्ये राज्य करत होता. आजपासून इंग्लंड विरुद्ध झिबाब्वे यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेमध्ये झिबाब्वेच्या संघाने पहिले नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात 26 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 130 धावा एकाही विकेट न गमावता केल्या आहेत. पण त्याआधी झिबाब्वेच्या संघाने २२ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. झिबाब्वेने आता इंग्लडच्या मैदानावर नवा पराक्रम केला आहे.
झिम्बाब्वे बऱ्याच काळानंतर इंग्लंडच्या भूमीवर परतला आहे. झिम्बाब्वेने २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहे. दोन्ही संघांमधील चार दिवसांचा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. झिम्बाब्वेने २००३ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर शेवटचा कसोटी सामना खेळला. तेव्हापासून संघाला येथे कसोटी क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली नाही.
ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा कसोटी सामना झिम्बाब्वेसाठी ऐतिहासिक कसोटी सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल. झिम्बाब्वेचा संघ २२ वर्षांनी इंग्लंडच्या भूमीवर पांढऱ्या जर्सीमध्ये खेळायला आला आहे. पाहुण्या संघाने २०२३ मध्ये इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. चार दिवसांच्या या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली आहे आणि हे वृत्त लिहिताना, बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी ५० पेक्षा जास्त धावा जोडल्या आहेत.
England openers Ben Duckett and Zak Crawley in cruise control against Zimbabwe early on Day 1 👊#ENGvZIM 📝: https://t.co/ViZB107lxh pic.twitter.com/mhfcJrXayv
— ICC (@ICC) May 22, 2025
डकेट उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक दृष्टिकोनाने खेळत आहे. या सामन्यातून सॅम जेम्स कुक इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. कुक हा एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या ८९ सामन्यांमध्ये ३२१ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा सामना करण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा चार दिवसांचा कसोटी सामना हा एक चांगला सराव मानला जात आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, जी २० जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे. एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे, जो २ जुलैपासून खेळला जाईल. मालिकेतील तिसरा कसोटी सामना १० जुलैपासून सुरू होईल, जो लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाईल. चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे.