GT VS RCB Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
राशिद खान विरुद्ध विराट कोहली सामना
टॉप 4 साठी आजचा सामना गुजरातसाठी महत्वाचा
विराट कोहलीला रोखण्याचे असणार आव्हान
Tata IPL 2026 GT Vs RCB Live: थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू होणार आहे. टॉप 4 मध्ये येण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुजरात टायटन्सला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दरम्यान नुकताच (IPL 2026) टॉस पार पडला. गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, मोहम्मद सिराज, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा असे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. गुजरात टायटन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. तर आरसीबी सध्या 2 स्थानी आहे. विराट कोहली, देवदत्त पाडीकल. रजत पाटीदार आणि भुवनेश्वर कुमार हे खेळाडू चांगले खेळी करत आहेत.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरला आहे. येथील पीच सपाट असल्याने बॉल बॅटवर व्यवस्थित येतो. त्यामुळे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना मदत मिळू शकते. नवीन बॉल असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग करण्यासाठी मदत मिळेल.सामन्याच्या दुसऱ्या डावात स्पिनर्सना मदत मिळू शकते. या ठिकाणी थोडा टर्न त्यांना मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात दव पडू शकते. त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो.
RCB Vs GT Pitch Report: अहमदाबादमध्ये बदल्याचा दुसरा अंक; ‘प्रिन्स’ विरुद्ध ‘किंग’ रंगणार सामना
या खेळपट्टीवर सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होतो, त्यामुळे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या स्पेलवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.आरसीबीचाकडून फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आपल्या घरच्या मैदानावर शुभमन गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. गुजरातला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर गिलची बॅट चालणे गरजेचे आहे.
आरसीबीचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांचे पारडे जड वाटत असले तरी, गुजरातला त्यांच्या घरच्या मैदावर कमी लेखणे आरसीबीला महागात पडू शकते. आजचा सामना केवळ दोन गुणांसाठी नाही, प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील महत्वाचा असणार आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा आरसीबीचा तर टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याचा गुजरातचा प्रयत्न असणार आहे.
‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, जॅकब बेथेल , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हॅझलवूड, रसिक सलाम डार , सुयश शर्मा.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा






